महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजन विचारेंची २.५ लाख मतांची आघाडी, एकनाथ शिंदेंनी विजयोत्सवाचे फोडले फटाके

राजन विचारे यांचा विजय निश्चित असल्याचा अंदाज बांधून ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी टेम्भी नाक्यावरील आनंदाश्रम येथे स्वत: फटाके फोडले आहे.

एकनाथ शिंदे फडाके फोडताना

By

Published : May 23, 2019, 5:34 PM IST

Updated : May 23, 2019, 8:37 PM IST

ठाणे - शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी १५ व्या फेरीदरम्यान २. ५ लाखांच्या मताधिक्याने मतमोजणीत आघाडी घेतली आहे. विजय निश्चित असल्याचा अंदाज बांधून ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी टेम्भी नाक्यावरील आनंदाश्रम येथे स्वत: फटाके फोडले आहे.

ठाणे-कल्याणचा गड राखला आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच चांगल्या मतांनी साथ दिल्याने जनतेचेही आभार मानले आहेत. पुन्हा एकदा भगवा ठाण्यात फडकवला असे सांगत त्यांनी राजन विचारे यांचे अभिनंदन केले. शिंदे यांनी आनंदाच्या भरात स्वतः टेम्भी नाक्यावरील आनंदाश्रम येथे फटाके फोडले आहेत.

एकनाथ शिंदेंनी विजयोत्सवाचे फोडले फटाके
अद्याप विजयी उमेदवाराची निवडणूक आयोगाने घोषणा केली नाही. मतदान मोजणीत एकूण ३३ फेऱ्या आहेत.
Last Updated : May 23, 2019, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details