महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 ठाण्यात कागद्याच्या लगद्यापासून साकारली सुंदर गणेशमूर्ती

गणेशोत्सव Ganeshotsav जसजसा जवळ येईल तसे अनेकजन विविध प्रकारच्या गणेशमुर्ती अनेकजण बनवत आहेत. ठाण्यातील वर्तकनगर भागात राहत असलेले जितेश सोलंकी यांनी गेल्या वर्षी प्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाची निर्मिती ही पर्यावरण पुरक केली आहे. गौरव चोणकर यांनी कागद्याच्या लगद्यापासून सुंदर गणेश मूर्ती Beautiful Ganesha Idol घडवली आहे.

Ganesha Idol Made From Paper Pulp In Thane
कागद्याच्या लगद्यापासून साकारली सुंदर गणेशमूर्ती

By

Published : Aug 23, 2022, 6:07 PM IST

ठाणेएकीकडे गणेशोत्सव Ganeshotsav Thaneकाही दिवसांवर येऊन ठेपला असतांना दुसरीकडे मूर्तिकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवतांना दिसत आहेत. यंदा मात्र कोविड काळात पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये झालेली जनजागृती लक्षात घेता ठाणेकरांनी पर्यावरणपुरक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेल आहे. ठाण्यातील वर्तकनगर भागात राहत असलेले जितेश सोलंकी यांनी गेल्या वर्षी प्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाची निर्मिती ही पर्यावरण पुरक Beautiful Ganesha Idol केली आहे.

कागद्याच्या लगद्यापासून साकारली सुंदर गणेशमूर्ती

कागद्याच्या लगद्यापासून गणेश मूर्ती

गेल्या 50 वर्षांपासून मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रवीण चोणकर Sculptor Praveen Chonkar आणि जे जे आर्ट ऑफ स्कुल मध्ये शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा गौरव चोणकर यांनी कागद्याच्या लगद्यापासून ही गणेश मूर्ती घडवली आहे. पेंढा, कागद, पुठ्ठा, लाकूड आणि फेविकोल चा वापर करुन हि गणेश मूर्ती घडवण्यात आली आहे. हि मूर्ती घडवण्यासाठी साधारण दीड महिन्याचा कालावधी लागला असुन या गणेश मूर्तीला शेवटची रंग रांगोटी करण्यात येत आहे.

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंच्या साहाय्याने गणेश मूर्ती घडवल्या
अतिशय सुंदर व सुबक घडवण्यात आलेली कागदाच्या लगद्यापासून 3 फुटांची ही गणेश मूर्ती सर्वांचच लक्ष केंद्रित करीत आहे. गेल्या वर्षी देखील सोनकर यांनी जितेश सोलंकी यांच्यासाठी नारळाच्या शेंड्या पासून गणेश मूर्ती घडवली होती. त्याचबरोबर मेणबत्तीच्या मेना पासून तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंच्या साहाय्याने देखील चोणकर यांनी गणेश मूर्ती घडवल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्तींमुळे तलावातील प्रदूषण, तलावतील माश्यांना होणारी जीवितहानी आणि पर्यावरणाच होणार नुकसाण लक्षात घेता ही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती पर्यावरणाच्या संगोपनासाठी फायदेशीर ठरणार असल्याचं चोणकर सांगतात.

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याचा प्रयत्नगणेश मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस Plaster of Paris Ganesha यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच हा राज टाळण्यासाठी असे प्रयत्न गरजेचे असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता सर्व गणेश भक्तांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन चोणकर यांनी केल आहे. तर पर्यावरणाचा विचार करता अशा गणेश मूर्तींना ठाण्यात मागणी वाढू लागली आहे.

हेही वाचाGaneshotsav 2022 अमरावतीच्या जिराफे बंधूंनी घडविल्या गौरी गणपतींच्या सुबक मुर्ती, मूर्तींना परदेशातही मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details