महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी बंजारा समाजातर्फे 'भोगभंडारा' - शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी बंजारा समाजातर्फे होमहवन

राज्यात सध्या राजकीय तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा लवकर सुटावा आणि राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे, या उद्देशाने बंजारा समाजाच्यावतीने मुलुंड येथे भोगभंडारा पुजन करण्यात आले. यावेळी सेवालाल महाराजांच्या समोर होम-हवन करण्यात आले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी बंजारा समाजातर्फे होमहवन

By

Published : Nov 5, 2019, 5:22 PM IST

ठाणे- राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटावा आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचा शिलेदार विराजमान व्हावा, यासाठी माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली 'भोगभंडारा' करण्यात आला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी बंजारा समाजातर्फे होमहवन

हेही वाचा -...आता शरद पवार काय करणार? संपूर्ण राज्याचे लक्ष

राज्यात सध्या राजकीय तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा लवकर सुटावा आणि राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे, या उद्देशाने बंजारा समाजाच्यावतीने मुलुंड येथे भोगभंडारा पुजन करण्यात आले. यावेळी सेवालाल महाराजांच्या समोर होम-हवन करण्यात आले. राज्यातील शेतकर्‍यांची वाताहत झालेली आहे. या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे सरकार सत्तेवर यावे, असे गार्‍हाणे यावेळी घालण्यात आले.

हेही वाचा -'माझा आमदार माझा मुख्यमंत्री' मातोश्रीबाहेर फलक

याप्रसंगी हरिभाऊ राठोड यांनी सांगितले, की राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची पिके नष्ट झालेली आहेत. या शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी शिवसेनेचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा भोगभंडारा आयोजित करण्यात आला होता. बंजारा समाजाने मिशन मुख्यमंत्री हे धोरण राबवले होते. त्यानुसार, शिवसेनेच्या हाती सत्तेचा रिमोट दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, ही आमची अपेक्षा आहे. म्हणूनच आम्ही संत सेवालाल महाराजांना साकडे घातले आहे. संत सेवालाल महाराजांकडे आम्ही साकडे घातले की, महाराष्ट्रातील शेतकरी हवालदील झाला आहे. या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावे.

यावेळी जगदीश शेट्टी, विभा परमुख, प्रदिप यादव, जीवन राठोड, सौरभ श्याम चव्हाण, आप्पासाहेब, पंडीत शेळके, रामू पवार, संतोष केनगे, रामदास राठोड, रवी राठोड आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details