महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Champa Singh Thapa: बाळासाहेबांची सावली चंपा सिंह थापा एकनाथ शिंदेंसोबत - Balasaheb shadow with Eknath Shinde

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला खिंडार पाडून राज्यात सत्ता काबीज केली तेव्हा बाळासाहेबांचे अनेक कट्टर समर्थकांनी एकनाथ शिंदे यांची कास धरली. त्यातच आता बाळासाहेबांची सावली समजल्या गेलेल्या थापा यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Sep 26, 2022, 8:32 PM IST

ठाणे - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या साथीने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली. मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटाकडे धाव घेतली. त्यातच आज सोमवार (26 सप्टेंबर)रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर बाळासाहेब ठाकरे यांची सावलीप्रमाणे आयुष्यभर साथ देणाऱ्या थापा यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. थापा हे कट्टर बाळासाहेबांचे समर्थक असले तरीही त्यांना आपली हिंदुत्वाची भूमिका पटल्यानेच ते आपल्या सोबत आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

बाळासाहेबांची सावली चंपा सिंह थापा एकनाथ शिंदेंसोबत

शिंदे गटाची ताकत वाढली - 2019 साली झालेली मविआ सरकार कोणालाच पटली नाही व तेच आता आपण सुधारण्याचा काम करत आहोत, त्यामुळे अजून अनेक लोक आपल्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेबांचे आणखी एक खंदे समर्थक मोरेश्वर राजे आणि इतर अनेक नेत्यांनी देखील शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शविल्याने शिंदे गटाची ताकत आणखी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

बाळासाहेबांचा थापा आला शिंदे गटात -चंपासिंग थापा असे नाव असताना केवळ थापा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या थापाने आज मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत व हे विचार आपल्याला पटत असल्यानेच आपण त्यांना समर्थन दिल्याची ग्वाही थापा यांनी दिली आहे. दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापित केलेल्या टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी देवीच्या आगमन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का लागेल का या चर्चेला उधाण आले आहे.

राजकीय वर्तुळात एकच खळबळ - आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी स्थापन केलेल्या टेंभीनाका येथील दुर्गेश्वरी मातेचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात सामील झालेल्या ठाण्यातील सर्वच नेत्यांनी आगमन सोहळ्यात भाग घेतला होता. या सर्व गर्दीत एक चेहरा मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होता आणि तो चेहरा होता ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा. खासदार विचारे हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक समजले जात असून त्यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विचारे केवळ देवीच्या दर्शनाला आले होते - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या इतर नेत्यांप्रमाणे राजन विचारे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होतील का अशी उलट सुलट चर्चा या वेळेला ऐकायला मिळत होती. देवीच्या पाठपुजन कार्यक्रमाला देखील खासदार राजन विचारे उपस्थित राहिल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांना आणखी एक जोर का झटका लागतो का, कि विचारे केवळ देवीच्या दर्शनाला आले होते हे लवकरच स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details