महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bajaj Allianz Life Insurance : बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या महिला मॅनेजरला बेड्या; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या ( Bajaj Allianz Life Insurance Company ) उल्हासनगर शाखेतील महिला मॅनेजरसह दोन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून केवळ कमिशनच्या लोभापायी आरोपी महिला मॅनेजरने पॉलिसीधारकांची फसवणूक Accused woman manager defrauded policyholders केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

By

Published : Oct 11, 2022, 1:04 PM IST

Updated : Oct 11, 2022, 2:02 PM IST

Bajaj Allianz Life Insurance
बजाज अलायंझ जीवन विमा कंपनी

ठाणे : बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या उल्हासनगर शाखेतील महिला मॅनेजरसह दोन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून केवळ कमिशनच्या लोभापायी आरोपी महिला मॅनेजरने पॉलिसीधारकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी महिला मॅनेजरने कोरोना काळातील टाळेबंदीचा फायदा उचलत एका साथीदाराच्या मदतीने बनावट कागदपत्र तयार केली. तर दुसऱ्या साथीदाराला तोतया मुलगा दाखवून फसवणुकीचा कारनामा करून आरोपी महिलेने पती पत्नीच्या नावाची जीवन विमा पॉलिसीचे ४६ लाख ६१ हजार २५२ रुपयांचा अपहार केला.

बजाज अलायंझ जीवन विमा कंपनी


विविध कलमानुसार गुन्हा दाखल :याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत महिला मॅनेजरसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सौ.मिनु पंकज झा, वय ३२ राहणार आसनगाव, शहापुर असे महिला मॅनेजरचे नाव आहे. तर विकास रामुप्रसाद गोंड, वय २५, राहणार पिसवली, कल्याण, अनुज गुरूनाथ मढवी वय ३०, राहणार घोडबंदर रोड, ठाणे हे तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


बजाज अलायंझ कंपनीच्या शाखेत २०१८ सालापासून मॅनेजर म्हणून कार्यरत :आसान बालानी यांचे उल्हासनगरमध्ये हॉटेल असून त्यांनी त्यांची आणि पत्नी पूजा बालानी अश्या दोघांच्या नावाने बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा २०१० मध्ये काढला होता. २०३० मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी ४६ लाख ६१ हजार रुपये मिळणार होते. त्यातच २०१८ सालापासून बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या उल्हासनगर शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत असताना मॅनेजर असलेली आरोपी महिला आसान बालानी यांच्या घरी आली. त्यांनी पूजा बालानी यांचा एक फोटो मोबाईलमध्ये काढला. तसेच केवायसी अपडेट करीत असल्याचे सांगत ओटीपी घेतला. त्यानंतर आसान बालानी यांना त्या महिला मॅनेजरने कार्यालयात भेटण्यास बोलावले. तेव्हा ह्या महिलेने आसान बालानी यांना त्यांच्या विम्यात नुकसान होत असून दुप्पट फायदा हवा असल्यास जुनी जीवन विमा योजना सरेंडर करण्याची मागणी केली. त्याला आसन यांनी विरोध केला होता.


आणखी एक फसवणुकीचा प्रयत्न करताना हा गुन्हा आला समोर :विरोध असूनही त्या दिवशी आरोपी महिलेने जुनी विमा पॉलिसी रद्द करून नवीन जीवन विमा काढला. त्यानंतर आसान बालानी यांनी त्यांची पॉलिसी तपासली असता त्यांना फसवणूक झाल्याचा प्रकार समजला. तत्काळ त्यांनी बजाज अलायंझ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार तपास केला असता कोरोनाच्या काळात लॉक डाऊनवेळी 'वर्क फार्म होम'चा गैरफायदा घेत, २०२० मध्ये संगणकाच्या सिस्टीममधून आसान बालानी यांचा मोबाईल नंबर काढून त्यात आरोपी मॅनेजर मिनू झा हिने तिचा मोबाईल नंबर टाकला. तसेच फोटो ही बदलला. त्यानंतर वर्षाला चार लाख रुपयांचा हप्ता असलेले दोन नवीन जीवन विमा काढले त्याच्या हप्त्याचे पैसे जुन्या जीवन विम्याच्या जमा रक्कममधून वळते केले होते. धक्कादायक बाब म्हणजे असाच आणखी एक फसवणुकीचा प्रकार आरोपी मॅनेजर महिला करण्याचा प्रयत्न करीत असताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर आसान बालानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही बाब विमा कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.


वर्क फार्म होम चा गैरफायदा घेत रचला डाव :आसान बालानी यांच्या समंती शिवाय पॉलीसी ब्रेक करून पॉलीसी सिस्टीम मधील त्यांचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी चेंज करून त्यामध्ये आरोपी मॅनेजर मिनू झा हिने स्वतः चा मोबाईल नंबर व ईमेल आयडी समाविष्ट करून त्याव्दारे ओटीपी घेवून आरोपी साथीदार विकास गोंड यांचेकडुन आसान यांच्या नावाचे बनावट लाईट बिल, वाहन चालक परवाना, बनावट चेक तयार करून घेवून दोन नवीन पॉलीसी काढल्या. त्यानंतर कोरोनाच्या काळातील टाळेबंदीत 'वर्क फार्म होम'चा गैरफायदा घेत रचला डाव रचत दोन्ही नवीन पॉलीसी ऑनलाईन व्हिडीओ व्हेरीफिकेशन करीता आसान यांचा मुलगा निरज बलानी याचे ऐवजी दुसरा आरोपी साथीदार अनुज मढवी याला उभे करून आसान व त्यांचा मुलगा निरज यांच्या खोटया सहया करून आर्थिक फसवणुक केली.
खळबळजनक बाब म्हणजे पोलीस कोठडीत असताना चौकशी दरम्यान आरोपी महिला मॅनेजरने २० टक्के कमशीन आणि पॉलिसीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. अशी माहिती सूत्राने दिली आहे.


Last Updated : Oct 11, 2022, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details