ठाणे - मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट देशासह राज्यावर आले आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण कल्याण डोंबिवली शहरात आढळून आले आहेत. यामुळे शहरातील आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांकडून दिले जाणाऱ्या सार्वजनिक पारितोषिकांचा कार्यक्रम रद्द करण्याचा आला आहे. विशेष म्हणजे पारितोषक वितरण सोहळा जरी रद्द केला असला. तरीही गेल्यावर्षी शांतता व सामाजिक सलोख्यासह समाज प्रबोेधन देखावे उभारणाऱ्या मंडळांना यंदा मंडपात जाऊन पोलिसांनी पारितोषक दिले आहे.
पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रद्द पण, मंडळांचा मंडपात जाऊन पोलिसांनी केला सत्कार - गणेश मंडळांचा सत्कार
ठाणे पोलीस आयुक्त (शहर) अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गणेश मंडळांना शांतता व राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने दरवर्षी सर्वच पोलीस परिमंडळामध्ये पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र कोरोनाच्या महामारीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत २६५ सार्वजानिक गणेशोत्सव मंडळे असून यापैकी सुमारे ९० मंडळानी यंदाच्या कोरोनाच्या संकटसमयी गणेशोत्सव रद्द केला आहे. तर ठाणे पोलीस आयुक्त (शहर) अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गणेश मंडळांना शांतता व राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने दरवर्षी सर्वच पोलीस परिमंडळामध्ये पारितोषक वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी शांतता व सामाजिक सलोख्यासह समाज प्रोबधन देखावे उभारणाऱ्या मंडळांना मंडपात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी पारितोषीके दिली.
आज कल्याण शहरातील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ५ मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक उत्कर्ष मित्र मंडळ, रामबाग या मंडळाला देण्यात आले. तर दुसरा क्रमांक त्रिगुणा मित्र मंडळ, तिसरा क्रमांक शिवनेरी क्रीडा मंडळ, चौथा मुरबाग मित्र मंडळ तर पाचवा राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब सिंधीगेट, या मंडळाना मिळाला आहे. या पाचही मंडळाच्या मंडपात जाऊन कल्याण विभागाचे पोलीस अधीक्षक अनिल पोवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याचप्रमाणे इतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पद्धतीने पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात येणार असल्याची माहिती अनिल पोवर यांनी दिली आहे.
हेही वाचा -जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत