ठाणे -खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेल्या रुग्णांच्या लुटीबाबत प्रशासनाने दखल घेत त्यांच्यावर कारवाई करून बिल आकारणीसाठी नवीन नियमावली देखील जारी केली आहे. मध्यंतरीच्या काळात अशाप्रकारे रुग्णांना लुटण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र पुन्हा असेच प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. ठाण्यातील कौशल्या रुग्णालयामध्ये देखील अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. त्यावर मनसे नेत्यांनी रुग्णालयाबाहेर रस्त्यावर झोपून आंदोलन केल्यावर प्रशासनाला जाग आली आणि मग त्यानंतर मृतदेह सोडल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
बिल न दिल्याने मृतदेह देण्यास टाळाटाळ.. मनसे नेत्याचे रुग्णालयाच्या गेटवर झोपून आंदोलन - मनसेचे आंदोलन
खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेल्या रुग्णांच्या लुटीबाबत प्रशासनाने दखल घेत त्यांच्यावर कारवाई करून बिल आकारणीसाठी नवीन नियमावली देखील जारी केली आहे. मध्यंतरीच्या काळात अशाप्रकारे रुग्णांना लुटण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र पुन्हा असेच प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे.
त्यानंतर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला परंतु रुग्णालयाच्या प्रशासनाने त्याला थारा दिला नाही. त्यानंतर नामुष्कीने महेश कदम यांनी रुग्णालया बाहेरच आंदोलन सुरू केले. त्यांनी चक्क हॉस्पिटलच्या दारात झोपून पैसे माफ करण्याची मागणी केली. जोपर्यंत मृतदेह ताब्यात देत नाही, तोपर्यंत मी असे झोपून आंदोलन करणार असल्याचे महेश कदम यांनी सांगितले. मात्र काही वेळानंतर हॉस्पिटल प्रशासन खाली आले आणि त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, आम्ही त्यांचा मृतदेह देणार आहोत काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा वेळ लागलेला आहे. काही वेळाने अखेर कौशल्या रुग्णालयाने उरलेले पैसे न घेता मृतदेह परत केला. यासारख्या घटना ठाण्यात अनेक ठिकाणी घडत असतात. अनेकांची आर्थिक स्थिती नसताना त्यांना अव्वाच्या सव्वा बिले भरावी लागतात. आता प्रशासन याकडे कसे बघेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हॉस्पिटलची चालुगिरी -
या रुग्णालयाच्या परिसरात मनसेने आंदोलन केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने लागली मृतदेह ताब्यात देणार असल्याचे सांगितले. मात्र मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून आज दुपारी तीन वाजेपर्यंत मृतदेह का ठेवून घेतला, याचे उत्तर मात्र रुग्णालय प्रशासनाने दिलेले नाही. त्यामुळे बिल बाकी असल्यामुळेच हा प्रकार झाल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले.
दुसरीकडे हे आंदोलन म्हणजे स्टंट असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.