महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Hanuman Chalisa Recitation : आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, 4 तारखेला हनुमान चालीसा पठण करणार - अविनाश जाधव

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांनी महाराष्ट्र सैनिकांना उद्या महाआरती करु नका अशा आदेशच पत्रक काढले आहे. तर उद्या अक्षय तृतीया बरोबरच ईद ( RAMADAN EID ) देखील आहे. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे आणि आमची भूमिका हि धार्मिक नसुन सामाजिक आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी आम्हाला उद्याच्या दिवस थांबायला सांगितले असल्याचे मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.

Avinash Jadhav
अविनाश जाधव, मनसे जिल्हा अध्यक्ष

By

Published : May 2, 2022, 7:23 PM IST

Updated : May 2, 2022, 7:33 PM IST

ठाणे - अक्षय तृतीया ( Akshaya Tritiya 2022 ) निमित्त उद्या मनसेकडून ठिकठिकाणी महाआरतीकरण्यात येणार होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांनी महाराष्ट्र सैनिकांना उद्या महाआरती करु नका अशा आदेशच पत्रक काढले आहे. तर उद्या अक्षय तृतीया बरोबरच ईद ( RAMADAN EID ) देखील आहे. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे आणि आमची भूमिका हि धार्मिक नसुन सामाजिक आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी आम्हाला उद्याच्या दिवस थांबायला सांगितले असल्याचे मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ( Avinash Jadhav on Hanuman Chalisa Recitation ) सांगितले आहे.

जामा मशिदी समोर हनुमान चालिसा पठण करण्यास परवानगी मागितली - उद्या त्यांच्या देवाने त्यांना भोंगे उतरविण्याची सुबुद्धी देवो हीच प्रार्थना असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. तसेच ४ तारखेपर्यंत भोंगे उतरवले गेले नाहीत तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, मी स्वतः मुंब्र्यातील सर्वात मोठी जामा मशिदी बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी ठाणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. जशी त्यांना परवानगी दिली जाते. तशी आम्हाला देखील पोलीस देतील ही खात्री आहे. जर परवानगी दिली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यायला लावु नका आम्ही 4 तारखेला मुंब्र्यात हनुमान चालीसा पठण करणार या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे देखील जाधव यांनी सांगितले आहे.

ठाणे गुन्हे शाखेने मागवली मनसे कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्ह्यांची माहिती - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 तारखेपर्यंत दिलेल्या अल्टीमेटच्या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखेने 1 जानेवारी 2019 पासुन ते आजपर्यंत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती ठाणे गुन्हे शाखेकडून ठाणे पोलीस आयुक्तालयाने मागवली आहे. मात्र पोलिसांकडून आम्हाला कोणतीही नोटीस आली नाही मात्र जरी आल्या तरी राज ठाकरे यांच्या आदेश सर्व ठिकाणी पाळला जाईल, अशा नोटिसा आम्हाला अनेकदा आल्या आहेत. आम्ही राज ठाकरे यांच्या आदेशाच पालन करणारे कार्यकर्ते आहोत आणि जर माहिती मागवायची झाली. तर आधी मुंब्र्यातील अनधिकृत मशिदी आणि त्यावरील भोंग्यांची मागवा जशी आमच्यावर कारवाई केली जाते. तशी त्यांच्यावर देखील करा असे वक्तव्य मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे.

अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी केली राज ठाकरे यांची नक्कल -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नक्कल केली. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी राज ठाकरे यांची ज्या पध्दतीने नक्कल केली आहे त्याचप्रमाणे राज ठाकरे त्यांच्या पद्धतीने येणाऱ्या सभेत नक्कल करतील आणि राज ठाकरे यांच्यावर जो कोणी आता टीका करत आहे त्यांना येणाऱ्या सभेत टीकेच उत्तर नक्की मिळेल असे अविनाश जाधव म्हणाले आहेत.

हेही वाचा - Ajit Pawar On Raj Thackeray : अजित पवारांनी केली राज ठाकरे यांची नक्कल! म्हणाले, काय ते एकदाच....

Last Updated : May 2, 2022, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details