महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; थरार सीसीटीव्हीत कैद - मनोज कटके हल्ला प्रकरण डोंबिवली

भाजपाच्या सोशल मीडियाचे काम पाहणारा कार्यकर्ता दुकानात काम करत असताना अज्ञात इसमांनी अचानक त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील भागात घडली आहे.

attack on BJP worker in Dombivli
भाजप कार्यकर्त्यावर हल्ला डोंबिवली

By

Published : Feb 28, 2022, 4:10 PM IST

ठाणे - भाजपाच्या सोशल मीडियाचे काम पाहणारा कार्यकर्ता दुकानात काम करत असताना अज्ञात इसमांनी अचानक त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील भागात घडली आहे. हल्ल्याचा थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. मनोज कटके, असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

हल्ल्याचे दृश्य

हेही वाचा -Indian Students in Ukrain : महाराष्ट्रासह भारतातील ५०० विद्यार्थी बँकरमधून बाहेर; मायदेशी परतणार

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज कटके यांचे डोंबिवली पूर्वेत दुकान असून आज सकाळच्या सुमारास दुकानात असताना अचानक दोन अज्ञात हल्लेखोर दुकानात घुसले. त्यानंतर मनोज काही विचारण्याच्या आदीच त्यांच्या डोळ्यात हल्लेखोराने मिरची पूड टाकून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मनोज गंभीर झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी काही मिनिटातच दुकानातून पळ काढला. जखमी अवस्थेत मनोजला डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले, तसेच भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची वार्ता समजताच रुग्णालयात भाजप कार्यकर्त्यानी गर्दी केली होती.

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

आमदार चव्हाण यांनी कटके यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडे माहिती घेतली. कटके यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याबाबत आमदार चव्हाण म्हणाले, भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून, पोलिसांनी लवकरात लवकर हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तर, कल्याण पोलीस परीमंडळचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना विचारले असता, हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हल्ला नेमका कुठल्या उद्देशाने करण्यात आला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून हल्लेखोरांच्या अटकेनंतरच सत्य समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा -Russia Ukraine Crisis : आम्ही स्वतःला जमिनीखाली ठेवलंय, लवकरात लवकर आम्हाला बाहेर काढा.. ठाण्यातील विद्यार्थिनीची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details