महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Crime : मुंब्र्यात एआयएमआयएमच्या कार्यालयावर हल्ला; घटना  सीसीटीव्हीमध्ये कैद - Attack on AIMIM office

मुंब्र्यातील AIMIM च्या पार्टी कार्यालयावर रात्री उशिरा काही अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार हल्ला करत दोघा जणांना जबर मारहाण केली आहे. हातात लोखंडी रॉड घेऊन हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद (Attack on AIMIM office incident caught on CCTV) झाली. संपूर्ण मुंब्रा शहरांत तणावाचे वातावरण पसरले (Attack on AIMIM office in Mumbra) आहे.

Attack on AIMIM office in Mumbra
मुंब्र्यात एआयएमआयएमच्या कार्यालयावर हल्ला

By

Published : Sep 23, 2022, 12:17 PM IST

ठाणे : मुंब्र्यातील AIMIM च्या पार्टी कार्यालयावर रात्री उशिरा काही अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार हल्ला करत दोघाजणांना जबर मारहाण केली आहे. हातात लोखंडी रॉड घेऊन हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद (Attack on AIMIM office incident caught on CCTV) झाली. संपूर्ण मुंब्रा शहरांत तणावाचे वातावरण पसरले (Attack on AIMIM office in Mumbra) आहे.

मुंब्र्यात एआयएमआयएमच्या कार्यालयावर हल्ला

लोखंडी रॉडच्या सहाय्याने कार्यालयात प्रचंड तोडफोड -संवेदनशील समजल्या मुंब्रा शहरांत काल रात्री घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री आठ ते नऊच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी हातात लोखंडी रॉड घेऊन मुंब्र्यातील बॉम्बे कॉलोनी येथील AIMIM या पार्टीच्या कार्यालयावर जोरदार हल्ला चढवला. सदर कार्यालय हे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष सैफ पठाण यांचे असून हल्लेखोरांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने संपूर्ण कार्यालयात प्रचंड तोडफोड केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सैफ पठाण यांच्या बिलाल काजी आणि फैज मन्सूरी या दोघांना जबर मारहाण (Attack on AIMIM office) केली.

हल्लेखोरांनी फैज आणि बिलाल यांना सैफ पठाण याला बोलवा, आज त्याला जीवानीशी मारू अशी धमकी देखील दिली. फैज आणि बिलाल यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने मुंब्रा येथे तणावाचे वातावरण पसरले (AIMIM office in Mumbra) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details