ठाणे -५ तारखेला मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर मृतदेह काढण्यासाठी ज्या रुग्णवाहिका चालकाने मदत केली होती त्या चालकांना आता एटीएसने चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीनंतर त्यांचा जवाब नोंदवला जाणार आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील मास्कच्या आत चार ते पाच रुमाल आढळून आले होते. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली असल्याचा संशय निर्माण झाला. त्यामुळे आता एटीएसने अब्दुल मामू या रुग्णवाहिका चालकाला घटनास्थळाची माहिती घेण्यासाठी आणि प्रत्यक्षदर्शी म्हणून जवाब नोंदवण्यासाठी ठाणे एटीएस कार्यालयात बोलावले आहे.
हेही वाचा -'डीएमके'च्या उमेदवारांची यादी जाहीर; स्टॅलिन यांच्या मुलालाही तिकीट
कोण आहे अब्दुल्ला मामू?
मुंब्रा कौसा भागात बेवारस मृतदेह सापडल्यावर अब्दुल्ला मामू यांना तो घेण्यासाठी फोन आला होता. मामू हे मृतदेहांना रुग्णालयात घेवून जाण्याचे काम मागील अनेक वर्षापासून करत आहेत. त्यांचे मामू असे टोपण नाव आहे. त्यांना त्यांच्या या कामाबाबत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.