महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sameer Jadhav Threatened Mahesh Aher : सहाय्यक आयुक्ताला दिली सहाय्यक आयुक्ताने धमकी; नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल - Threat from Assistant Commissioner Sameer Jadhav

ठाण्यातील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर ( Assistant Commissioner Mahesh Aher ) यांना सहायक आयुक्त समीर जाधव ( Assistant Commissioner Sameer Jadhav ) यांच्याकडूनच धमक्या मिळत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून नौपाडा पोलीस ( Naupada Police ) याबाबत तपास करत आहेत.

Sameer Jadhav Threatened Mahesh Aher
समीर जाधवने महेश आहेरला धमकी दिली

By

Published : Jul 23, 2022, 7:39 PM IST

Updated : Jul 23, 2022, 9:01 PM IST

ठाणे -ठाण्यातील अतिक्रमण,अनधिकृत ( Unauthorized construction in Thane ) व्यवसायांवर बंद करण्याचे काम गेले अनेक दिवस सुरू आहे. यामधे ठाण्यातील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मात्र, आता सहाय्यक आयुक्तांच्या बेधडक कारवाहीविरुद्ध खुद्द प्रशासनातील दुसरे सहाय्यक आयुक्त समीर जाधव ( Assistant Commissioner Sameer Jadhav ) यांच्याकडूनच धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचे असा सवाल उपस्थित होत आहे.

सहाय्यक आयुक्ताला धमकी

अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई -ठाण्यातील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर ( Assistant Commissioner Mahesh Aher ) हे गेले अनेक दिवस अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई करत आहेत . मात्र, या कामांचे कौतुक करण्याऐवजी सहाय्यकआयुक्तांकडून कुटुंब संपवण्याच्या धमक्या आहेर ( Threat to Assistant Commissioner Mahesh Aher ) यांना येत आहे. याबद्दल महेश आहेर यांनी नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून नौपाडा पोलीस ( Naupada Police ) याबाबत तपास करत आहेत.

सहायक आयुक्त समीर जाधव यांच्याकडून धमकी -ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ( Thane Municipal Corporation ) अनधिकृत बांधकाम, व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत या विरोधात कारवाही करून ते व्यवसाय बंद करण्याचे कार्य महेश आहेर अनेक दिवस करत आहेत मात्र याच मुळे त्यांना सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्याकडून धमकी ( Threat from Assistant Commissioner Sameer Jadhav ) येत असल्याची बाब आहेर यांनी उघडकीस आणली . तसेच मी प्रशासकीय मार्गाने काम करीत राहीन , त्याच प्रमाणे समोर जाधव यांच्यावर कारवाही व्हावी असे देखील महेश आहेर यांनी सांगितले.



कळव्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम -त्याच प्रमाणे कळव्या मधील अनधिकृत बांधकामांवर अधिक लक्ष ठेवलं जाईल , समीर जाधव हे कळवा अंदन दील्याप्रमने अनधिकृत बांधकामांना अभय देत आहेत आणि मला धमकिं देत आहेत त्यामुळे त्यांना कोणता राजकीय पाठिंबा आहे हे माहीत नाही पण मी माझं कार्य करत राहीन असेही यावेळी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी सांगितले

Last Updated : Jul 23, 2022, 9:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details