महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटनेप्रकरणी वास्तुविशारदास अटक - thane crime news today

नारपोली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सदर गोदाम इमारतीचे वास्तुविशारद दुर्राज शमीम कामणकर उर्फ केके इंजिनियर ( वय ४९ वर्षे ) यास शनिवारी अटक केली आहे.

Bhiwandi warehouse building accident
Bhiwandi warehouse building accident

By

Published : Feb 20, 2021, 7:12 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका येथील हरिहर कंपाउंड येथे गोदामाची इमारत कोसळल्याची दुर्घटना १ फ्रेब्रुवारी रोजी सकाळाच्या सुमारास घडली होती. त्यावेळी या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले होते. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र गोदाममालक हे स्थानिक शेतकरी व भूमिपुत्र असल्याने हे गोदाम बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार व वास्तुविशारद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानी नागरिकांनी पोलीस व शासकीय यंत्रणेकडे केली होती. अखेर नारपोली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सदर गोदाम इमारतीचे वास्तुविशारद दुर्राज शमीम कामणकर उर्फ केके इंजिनियर ( वय ४९ वर्षे ) यास शनिवारी अटक केली आहे.

एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष नसल्याने अनधिकृत बांधकामे

भिवंडीतील ग्रामीण भागात गोदाम पट्टा झपाट्याने वाढला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकासक आपल्या ताब्यात घेऊन सुस्थितीतील गोदामे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याच्या विक्रीतून बक्कळ पैसा कमावून स्थानिक जमीन मालकांना कमकुवत बांधकामे असलेली मालमत्ता देऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असून या परिसरातील बांधकामांवर एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष नसल्याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होऊन स्थानिक शेतकरी जमीन मालक व शासन यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. विकासकांच्या या मनमानी कारभाराला आळा घालणे गरजेचे असून एमएमआरडीए प्राधिकरणासह महसूल विभागाने त्यासंदर्भात लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

वास्तुविशारद न्यायालयीन कोठडी

अटकेत असलेल्या वास्तुविशारद दुर्राज शमीम कामणकर उर्फ केके इंजिनियर हा कोसळलेल्या गोडावून इमारतीचे बांधकामाचा आर्किटेक्ट, सव्र्हेअर व कन्सल्टिंग इंजिनियरिंगचे काम केले होते. त्यामुळे त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. शनिवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत व निकृष्ट बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details