महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maratha Federation of India : देश आरक्षण मुक्त करा; भारतीय मराठा महासंघाची मागणी - भारतीय मराठा महासंघाची आरक्षण हटवण्याची मागणी

हिंदू एकत्र न येणे याला आरक्षण हेच कारण असल्याचे सांगत देश आरक्षणमुक्त करावा अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर यांनी केली आहे. (Maratha Federation of India ) मराठा समाज सोडून सर्वांना आरक्षण दिले आहे अशी खंत व्यक्त करत त्यांनी सर्वांना न्याय मिळावा यासाठी समान नागरी कायद्याची मागणी केली आहे.

देश आरक्षण मुक्त करा; भारतीय मराठा महासंघाची मागणी
देश आरक्षण मुक्त करा; भारतीय मराठा महासंघाची मागणी

By

Published : Apr 5, 2022, 9:05 AM IST

ठाणे -हिंदुस्थानातील हिंदू एकत्र न येणे याला आरक्षण हेच कारण असल्याचे सांगत देश आरक्षणमुक्त करावा अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर यांनी केली आहे. (Apply the same civil law) मराठा समाज सोडून सर्वांना आरक्षण दिले आहे अशी खंत व्यक्त करत त्यांनी सर्वांना न्याय मिळावा यासाठी समान नागरी कायद्याची मागणी केली आहे. कुटुंब नियोजन कायदा झालाच पाहीजे व शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा अशी आपण केंद्र सरकारकडे मागणी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

देश आरक्षण मुक्त करा; भारतीय मराठा महासंघाची मागणी

शिवस्मारक सरकार बनवते की बुडवते - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक आत्तापर्यंत होऊ नये हे या महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. बाळासाहेबांनी पूर्वी या स्मारकासाठी जागा दिली होती त्याचे काय झाले? असा परखड सवाल त्यांनी केला आहे. भरसमुद्रात होऊ घातलेल्या प्रस्तावित शिवस्मारकाला सरकार बनवते की बुडवते ते पाहावे लागेल अशी खोचक टीकाही आप्पासाहेबांनी केली आहे.

मराठा महासंघाचे काम गेली अनेक वर्षे सुरू - भारतीय मराठा महासंघाचे संमेलन ठाण्यात संपन्न झाले, यावेळी महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून भारतीय मराठा महासंघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, ठाणे शहर अध्यक्षपदी अंकुश मढवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात भारतीय मराठा महासंघाचे काम गेली अनेक वर्षे सुरू असून भविष्यात ते अधिक व्यापक प्रमाणावर सुरू करण्याचा मानस संघाच्या सदस्यांचा आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिक तयारी नाही - भारतीय मराठा महासंघाने संपूर्ण देशात आरक्षण रद्द करण्यात यावे अशी मागणी केली असून राष्ट्रीय पातळीवर समान नागरिकत्व लागू करण्यात यावी अशी मागणी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब आहेर यांनी केली आहे. ठाणे शहारत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आहेर यांनी मागणी केली आहे. देशासह राज्यात कोणतीहा राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिक तयारी नसल्याने यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या बाहेरही महासंघ वाढणार -मराठा समाजाच्या मुलांना रोजगार उपलब्ध करण्याबरोबरच उद्योग आघाडी देखील स्थापन करण्यात आली असून त्यामुळे मराठा समाजातील होतकरू मुलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेली नवीन कार्यकारणी काम करणार आहे. महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमध्ये राष्ट्रीय मराठा महासंघाच्या नियुक्त्या करून एक प्रबळ शक्ती उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश पाटील, ठाणे शहर अध्यक्ष अंकुश मढवी यांच्यासह इतर नियुक्त्यांची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारमध्ये फेरबदल होण्याची शक्यता; लवकरच नेत्यांची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details