ठाणेआज ठाण्यातील दिवंगत नेते Leader of Thane आनंद दिघे यांची Anand Dighe death anniversary पुण्यतिथी. आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी आनंद दिघे यांचा गणेशोत्सवाच्या दरम्यान अपघात झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. आजही त्यांच्या मृत्यू बाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जातात. पण त्या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांना गमावले, त्याचे दुख आजही संपूर्ण ठाणेकरांसह महाराष्ट्राला आहे. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रांनी त्यांच्या सोबत घालविलेल्या आठवणी ताज्या friends gave us memories केल्या आहेत.
आनंद दिघे या नावाला राजकीय, सामाजिक वलय आहेच. पण हे नाव, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठीही खुप महत्वाचे आहे. कारण मुख्यमंत्री हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत आणि राजकीय सामाजिक वारसा आनंद दिघे यांच्या कडून मिळाल्याने, त्यांनी आज एवढे महत्वाचे पद भुषवले आहे, असे त्यांनी आतापर्यंत अनेकदा सार्वजनिक रित्या कबुल देखील केले आहे. आनंद दिघे यांची राजकीय सुरवात ही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून झाली. सुरवातीला सामाजिक काम करतांना बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसेनेबद्दल, आनंद दिघे यांना प्रेम निर्माण झाले. कालांतराने आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे हे एक घनिष्ठ नाते निर्माण झाले. या नात्यातून बाळासाहेबांनी आनंद दिघे यांना संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी दिल्यानंतर आनंद दिघे यांनी जिल्हाभर शिवसेनेची वाढ केली. पक्षाची वाढ करत असतांना आनंद दिघे यांना अनेक कार्यकर्ते मिळाले. ज्यांनी या पक्ष वाढीसाठी मोलाचे काम केले, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील होते. आनंद दिघे यांनी जिल्हाभर केलेले काम आणि त्यांची कामाची पद्धत ही सर्वसामान्यांपासून अनेकांना पसंतीची ठरली. त्यामुळे फक्त ठाण्यात नव्हे ,महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात आनंद दिघे हे नाव अगदी थोड्यावेळातच नावलौकिकाला आले. आनंद दिघे यांचे अहो रात्र सुरू असलेले काम हे संपूर्ण ठाण्याने अनेक दशक उघड्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणून आजही त्यांना ठाण्यात दैवत म्हणून मानले जाते.
बाहात्तर वर्षीय एकनाथ काजारी हे देखील आपल्या युवा अवस्थेपासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत काम करत होते. धर्मवीर आनंद दिघे यांनी आपले आयुष्याचा प्रवास हालाखीच्या दिवसातून सुरू केला आणि असे असतांनाही कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये ते मागे राहिले नाहीत. गरीब, थोर. श्रीमंत. लहान मोठे या सर्वांच्या अडचणी त्यांनी सोडवल्या आणि अशाच काही आठवणी आजही त्यांच्यासोबत काम केलेल्या मित्रमंडळींच्या मनात घर करून आहेत.
ठाण्यात सुरू केली मानाची दहीहंडीआज जगभरात ख्याती पसरलेली दहीहंडी ही ठाण्यात अनेक वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी सुरू केली. ही दहीहंडी सुरू झाल्यानंतर, या सणाला ठाणा मुंबईत उत्सवाचे स्वरूप आले आणि यातूनच आज 22 वर्षानंतर या खेळाला सरकारची मान्यता मिळाली आहे. ठाण्यातून सुरू झालेला हा खेळ आज जगभरात गेला असला तरी या खेळामध्ये पहिल्यांदा आवश्यक ती खबरदारी घेण्याचे काम आनंद दिघे यांनी एकनाथ गाजरी या त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यावर सोपविले होते. गाजरी यांनी जखमी गोविंदांवरती उपचार करणे आणि त्यावर सर्वतोपचार झाल्यावरच त्याला घरी सोडणे ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.