महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'शरीरसौष्ठव'साठी निधी देण्यास अंबरनाथ पालिकेचा नकार; उपनगराध्यक्षावर 'भीक मांगो'ची वेळ - Ambarnath latest news

अंबरनाथ पालिकेने शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत सत्ताधारी शिवसेनेच्या उपनरगाध्यक्षाना नकार दिला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्यावर चक्क भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

ambarnath-municipalitys-refusal-to-fund-the-bodybuilding-competition
शरीरसौष्ठव स्पर्धेला निधी देण्यास पालिकेचा नकार; उपनगराध्यक्षावर भीक मांगो आंदोलनाची वेळ

By

Published : Feb 28, 2020, 10:14 PM IST

ठाणे - अंबरनाथ पालिकेने शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या उपनगराध्यक्षाना नकार दिला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्यावरच चक्क भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

शरीरसौष्ठव स्पर्धेला निधी देण्यास पालिकेचा नकार; उपनगराध्यक्षावर भीक मांगो आंदोलनाची वेळ

शरीरसौष्ठवपटू म्हणून नावाजलेल्या स्वर्गीय रमेश गोसावी यांच्या स्मरणार्थ पालिकेच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन २९ फेब्रुवारीला उपनगराध्यक्ष शेख यांनी केले आहे. या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी पालिकेकडून १० लाख रुपये मंजूर झाले असतांना देखील ते दिले जात नसल्याने पालिकेच्या निषेधार्थ हे आंदोलन उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केले. अंबरनाथ स्टेशन परिसरात हे भीकमांगो आंदोलन करण्यात आले. मात्र, पालिकेने त्यांना निधी उपलब्ध करून देण्यास नकार दिला. त्यामुळे ही स्पर्धा लोक वर्गणीतून करणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान येत्या काही दिवसातच पालिकेची निवडणुकी होणार आहे. शिवसेनेतील गटबाजीमुळे हा वाद निर्माण झाल्याची शहरात चर्चा आहे. या वादामुळे शिवसेनेला निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details