नवी मुंबई -वाशी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला तिकीट खडकी व्हावी, यासाठी पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत व नगरसेविका वैजयंती भगत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तिकीट खिडकीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाला नागरिकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा... IND Vs BAN : दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे ३४३ धावांची आघाडी, अग्रवालचे शानदार द्विशतक
वाशी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला तिकीट खिडकी नसल्यामुळे पूर्व बाजूने जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कित्येक वेळा रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधूनही रेल्वे प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे भगत यांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही तिकीट खिडकी न झाल्याने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.