ठाणे धनलाभ होईल या अंधश्रद्धेपोटी superstition of money gain कासवाची अघोरी पद्धतीने सुरू असलेली पूजा जागरूक नागरिकांमुळे उधळून Aghori puja plan of turtle foiled Thane लावली गेली. ही घटना कल्याण पूर्वेतील निर्जनस्थळ असलेल्या साकेत कॉलेज रोडवर एका झाडी झुडपात ठिकाणी घडली आहे. मात्र हा सर्व अघोरीचा प्रकार सुरू असताना काही जागृत नागरिकांचं त्या ठिकाणी लक्ष गेले. त्यामुळे नागरिकांनी विचारपूस करताच पूजा अर्चना करणारे मांत्रिकांनी कासवाला सोडून पळ काढला wizards ran away leaving tortoise Thane आहे.
कासवांच्या जीवाशी खेळ सुरूचस्टार जातीच्या कासवावर जादूटोणा करत Witchcraft on the Star Tortoise, पूजा केल्याने झटपट श्रीमंत होतो. याच अंधश्रध्देतून एकीकडे या प्रजातीच्या कासवांची तस्करी वाढल्याचे कल्याण वन विभाग व प्राणीमित्र संघटनांनी अनेकदा केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या कासवावर समोर आले आहे. विशेष म्हणजे वनविभाग प्राणी मित्र संघटनाकडून स्टार जातीचे कासव बाळगण्यास, पाळण्यास बंदी आहे. मात्र कासवामुळे धनलाभ होतो ही अंधश्रद्धा असल्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहेत. त्यानंतरही अंधश्रद्धेच्या आहारी जात चोरी छुप्या पद्धतीने या कासवांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. त्यातच कल्याण पूर्व परिसरात साकेत कॉलेज रोडवर एका झाडी झुडपात काहीजण कासवांसोबत काही अघोरी कृत्य पूजा अर्चना करत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी जाब विचारताच या मांत्रिक लोकांनी घाबरून तेथून पळ काढला.