महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 7, 2022, 9:03 PM IST

ETV Bharat / city

वेब सिरीज पाहून बँक तिजोरीतून ३४ कोटींची रोकड लंपास; आरोपीकडून ३० कोटीची रोकड हस्तगत

Thane Crime: बँकेत कामावर असताना व फावल्या वेळात बँक दरोड्याच्या युट्युबवरून वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारून ३४ कोटींची रोकड लंपास केली. Thane Crime विशेष म्हणजे चोरीचे बिंग फुटण्यापूर्वी १२ कोटीची रोकड बँकेच्या कॅश कस्टोडियन मॅनेजरने तीन मित्रांच्या मदतीने पळवली होती. याच गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी Manpada Police अडीच महिन्याच्या तपासानंतर पुण्यातून मुख्य आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे.

Thane Crime
Thane Crime

ठाणे: बँकेत कामावर असताना व फावल्या वेळात बँक दरोड्याच्या युट्युबवरून वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारून ३४ कोटींची रोकड लंपास केली. Thane Crime विशेष म्हणजे चोरीचे बिंग फुटण्यापूर्वी १२ कोटीची रोकड बँकेच्या कॅश कस्टोडियन मॅनेजरने तीन मित्रांच्या मदतीने पळवली होती. याच गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी Manpada Police अडीच महिन्याच्या तपासानंतर पुण्यातून मुख्य आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे. मानपाडा पोलिसांनी Manpada Police आतापर्यत ३० कोटींची रोकड आरोपी कडून हस्तगत केली आहे. अल्ताफ शेख (वय ४३ ) असे अटक केलेल्या कॅश कस्टोडियन मॅनेजरचे नाव आहे.

वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला

३४ कोटीची रोकड लपवली होती बँकेच्या कचरापेटी नजीकडोंबिवलीतील एमआयडीसी भागात आयसीआयसीआय बॅक आहे. या बँकेत मुख्य आरोपी अल्ताफ हा कॅश कस्टोडियन मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीत असलेल्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा वर्षभरापूर्वी कट रचला होता. या करीत तो बँकेत दरोड्याच्या वेब सिरीज पाहत होता. काही बेव सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची कल्पना आली. त्यातच तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेच्या विषयी सर्वच माहिती होती. त्याने एके दिवशी बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम करताना पहिले आणि त्या दिवसापासून तो एसीच्या डक्टमधून कसे बँकेच्या तिजोरीत जाता येईल याची योजना आखली, आणि सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास केला आणि चोरीची योजना आखण्यासाठी चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केली. त्यानंतर ८ ते १३ जुलैपर्यत तिजोरीतून ३४ कोटी रुपये त्याने एसीच्या डक्टमधून बनवलेल्या छोट्या छिद्रातून ही रोकड बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या कचरा पेटीनजीक ताडपत्रीने झाकून ठेवली होती.

परंतु एकही सुगावा सापडला नाहीमानपाडा पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “एक महिन्यापेक्षा जास्त काळ, आम्ही आरोपींकडे नेणारा कोणताही सुगावा नसताना शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून त्याने त्याच बँकेत ११ वर्षे काम केले. या बँकेत रुजू होण्यापूर्वी त्यांच्याकडे तीन खाजगी नोकऱ्या होत्या, मात्र त्यांच्या विरोधात कोणत्याही कर्मचार्यांकडून कधीही तक्रार आली नाही. आम्ही त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर बारीक नजर ठेवली, तो कुठूनही पैसे खर्च करत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचे अॅमेझॉन आणि इतर ई-कॉमर्स खात्यांचा शोध घेतला. तांत्रिक विश्लेषण गोळा केले, परंतु एकही सुगावा सापडला नाही.

चोरीची कट असा रचलाकॅशचे कस्टोडियन मॅनेजर असलेल्या आरोपी शेखने रोख रक्कम तिजोरीत कशी नेली, जादा रोकड कधी नेली आणि किती वेळा पैशांची तपासणी झाली याची माहिती घेतली. चोरीसाठी लागणारी सर्व उपकरणे ठेवण्यासाठी त्याने वर्षभरापूर्वी तळोजा येथे आपल्या बहिणीच्या नावे फ्लॅट खरेदी केला. त्याने त्याचा वापर त्याच्या चोरीची योजना कशी करायची यासाठी देखील या फ्लॅटचा वापर केला. याच फ्लॅटमधून त्याने बँकेच्या तिजोरीचे आणि इतर भागांचे व्हिडिओ संग्रहित केले आणि योजना आखण्यासाठी त्यांचा अभ्यास केला. चोरीची रोकड ठेवण्यासाठीही घराचा वापर केला जाणार होता. त्यानंतर त्याने पैसे लपवून ठेवता येईल अशा छिद्राचा शोध सुरू केला. बँकेच्या एअर कंडिशनरला क्वचितच दुरुस्तीची गरज भासत असे, त्यावेळी आरोपी शेख याने दुरुस्तीचे काम पाहिले. या डक्टच्या शेजारीच बँकेची तिजोरी असल्याने पैसे खाली उतरवण्यासाठी एअर कंडिशनरच्या डक्टचा वापर करण्याचे त्याने ठरवले.

कट रचून त्याने चोरी केल्याचे तपासातपोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि, “डक्ट 10 इंच रुंद होता, त्याने मेटल शीट गॅस कटरच्या सहाय्याने कापून पाच ते सहा इंच रुंद केले. तिजोरी रिकामी असताना त्याचे व्हिडिओ काढले. अलार्म सिस्टम सदोष असताना काही सीसीटीव्ही निकामी झाले आहेत आणि ते निष्क्रिय केले जाऊ शकतात हे त्याला माहीत होते. बँकेच्या समोर सुरक्षा रक्षकच होते तर मागच्या बाजूला कोणीही नव्हते. त्याने त्याच्या वरिष्ठांचे लॉगिन तपशील देखील मिळवले, शनिवारी, इतर कर्मचारी निघून गेल्यावर, त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये लॉग इन करून त्यांना थांबवले आणि स्क्रीनवर तिजोरी रूमचे फुटेज चिकटवले आणि काही काळ ते टेम्परिंग ठेवले जेणेकरून तिजोरीची मॉनिटर पाहणाऱ्या सुरक्षा रक्षकाला तिजोरी रूममध्ये कोणी नसल्याचे दिसून येईल असा कट रचून त्याने चोरी केल्याचे तपासात समोर आले.

बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळविशेष म्हणजे आरोपी शेखने बँकेतील अलार्म देखील निष्क्रिय करून ठेवले होते. तर व्हॉल्ट दोन चाव्यांनी उघडला गेला ज्या एकाच वेळी वापरल्या जाणार होत्या. तो कस्टोडियन मॅनेजर असल्याने चाव्या बनवू शकत होता. अलार्म निष्क्रिय केल्यानंतर आणि सीसीटीव्हीची तोडफोड केल्यानंतर, त्याने तिजोरी उघडली आणि रोख एसी डक्टमधून इमारतीच्या मागच्या बाजूने टाकली. एवढं करूनही त्याची योजना कधीही पळून जाण्याची नव्हती, त्याचा असा विश्वास होता कि, बँकेमधील तिजरोच्या रक्कमेची तपासणी दीड महिन्यापेक्षा जास्त काळ नियोजित नव्हती. म्हणून, त्याने हळूहळू रोख काढून टाकण्याची योजना आखली. मात्र, सोमवारी बँकेच्या लक्षात आले कि, बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ आहे. त्यामुळे त्यांनी बँकेच्या वरिष्ठाना याची माहिती देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत दाखल झाले होते.

३४ कोटींपैकी सुमारे १२ कोटी रुपये घेऊन पोबारादुसरीकडे आपली चोरी पकडली जाईल म्हणून स्वत:च्या मुख्य आरोपीने तपासणी पथकाला बोलाव, त्याआधी घाबरलेल्या आरोपी शेखने घाईघाईने शक्य तितकी रोख रक्कम घेऊन पोबारा करायचे ठरवले. यासाठी त्याने डक्टमध्ये टाकलेल्या ३४ कोटींपैकी सुमारे १२ कोटी रुपये , त्याच्या तीन मित्रांना बोलावले आणि सहआरोपी अबरार कुरेशी (33), अहमद खान (33) आणि अनुज गिरी, 30, एका टेम्पोसह आणि टेम्पोमध्ये 5.80 कोटी रुपये ठेवले, तर तो सुमारे 3 कोटी रुपये घेऊन पळून गेला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, ऐरोलीतील एका निर्जन इमारत त्याने पाहिली होती. याच इमारतीमध्ये चोरीची काही रक्कम लपवून ठेवण्याचे ठरवले होते. त्याने काही नोटांनी भरलले बॅग या इमारतीत ठेवले होते. मात्र बॅग ठेवताना त्याला एका फिरस्ताअसलेल्या गर्दुल्ल्याने व्यतीने पाहिले, त्या नंतर त्या व्यसनी आणि बेघर असलेल्या तीन अल्पवयीन तरुणांनी हेच पैसे डान्स बार, आणि इतर ठिकाणी उधळण केल्याचे समोर आले. पोलीस पथकाने हजारो सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला आणि सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर येथील हॉटेल्समध्ये त्याच्या हालचाली टिपल्या होत्या.

हार्डडिस्कसह पकडलेमानपाडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस बगाडे म्हणाले, “आम्ही त्याला त्याच्या हार्डडिस्कसह पकडले ज्यात त्याने बँकेच्या तिजोरीचे व्हिडिओ घेतले होते आणि चोरीची योजना आखण्यासाठी त्याने केलेले सर्व पार्श्वभूमी संशोधन होते. त्याला अटक करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत, आतापर्यत त्याच्या व त्याला मदत करणाऱ्या आरोपीकडून आतापर्यत ३० कोटी जप्त केले असून पुढील काही दिवसांत उर्वरित रोख रक्कमेचा शोध घेऊन जप्त करण्यात येणार असल्याचेही सांगितले. आरोपी शेखची बहीण निलोफर, (वय ३५ ), जी पळून जात असताना त्याच्या हालचालींबद्दल माहिती होती, तिने तिच्या घरी काही रोख लपवून ठेवले होते आणि तिच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची अधिक माहितीचोरी केल्यानंतर त्याने घाईघाईने त्याच्या तीन बालपणीच्या मित्रांना मदतीसाठी बोलावले. कुरेशी यांच्या मालकीचे गॅरेज आहे. तर खान हा टेम्पो चालक असून त्याचे टेम्पो वापरले जात होते. तर गिरी देखील चालक आहे. शेख या तिघांना लहानपणापासून ओळखत होता. हे तिघेही मुंब्रा भागात राहणारे असून पोलिसांनी या आदीच तिन्ही आरोपीना अटक करून यांच्याकडून ५ कोटी ८० लाखाची रक्कम जप्त केली आहे. दरम्यान पुढील आठवड्यात या गुन्ह्याची पूर्ण रक्कम हस्तगत करून येणार आहे. त्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची अधिक माहिती देणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद बागडे यांनी दिली आहे.

कोण आहे अल्ताफ शेखअल्ताफने आयसीआयसीआय बँकेत रुजू होण्यापूर्वी तीन खासगी कंपन्यांमध्ये लिपिक म्हणून काम केले, त्याच्या चांगल्या कामामुळे त्याला तीन वर्षांत कस्टोडियन मॅनेजर म्हणून बढती मिळाली. ११ वर्षात त्यांची कधीही शाखेतून बदली झाली नाही. तो त्याची आई, पत्नी आणि मुलीसह मुंब्रा येथे राहत होता, त्याच्या सहकाऱ्यांनी दावा केला की तो विश्वासार्ह आहे आणि पूर्वी रोख रकमेची कोणतीही समस्या नव्हती. दोन तीन वर्षांपूर्वी शेखच्या मोठ्या आणि धाकट्या बहिणीचा घटस्फोट झाला आणि दोघेही त्यांच्या कुटुंबासह त्याच्याकडे राहायला आले तर त्याचे वडीलही त्यांना सामील झाले. आरोपी शेख आणि त्यांची पत्नी हे एकमेव कमावते होते. मात्र १० ते १२ लोकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होते. हताश होऊन पैशाच्या त्रासावर मात करण्यासाठी त्याने चोरीची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. तर तपासात पोलिसांना साथ देणाऱ्या पत्नीपासून तो काही महिन्यापूर्वीच वेगळा राहात असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details