ठाणे -ठाणे महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केल्यानंतर ठाणे महापालिका अतिक्रमण विभाग पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आली आहे. ठाणे बाजारपेठेत महापालिका अतिक्रमण विभागाने आज (गुरुवारी) अनधिकृत बसलेल्या फिरीवाल्यांचे सामान जप्त करत वाढीव बांधकाम केलेल्या दुकानांवर जोरदार कारवाई करायला सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अतिक्रमण विभागाने तीन टीम तयार केल्या आहेत. ज्याठिकाणी अनधिकृत फेरीवाले बसलेले असतील त्यांच्यावर अशा प्रकारच्या कारवाईला आता सुरुवात झाली आहे.
दररोज कारवाई करावी नागरिकांची मागणी