ठाणे -युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांची आज निष्ठा यात्रा भिवंडी ( Nishtha Yatra Bhivandi ) येथून सुरुवात झाली. निष्ठा यात्रा सुरुवात होण्यापूर्वी ठाणे नगरीत आदित्य ठाकरे यांचे शिवसेनेकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आला. त्यानंतर आदित्य ठाकरे भिवंडीच्या दिशेने जात असताना रस्त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घर लागते. या घराबाहेर थांबलेल्या शिवसैनिकांना भेट देत आदित्य ठाकरे भिवंडीच्या दिशेने रवाना झाले. निष्ठा यात्रेला आदित्य ठाकरे यांनी ठाणे शहर वगळले असून या निष्ठा यात्रेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray fleet of cars ) थांबले. यावेळी त्यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. यामुळे सर्वांचे एकच भुवया उंचावल्या आहेत.
आदित्य ठाकरे यांचा फिला एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर थांबला राजकीय अस्थिरतेनंतर आदित्य ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. परंतु आजच्या प्रकरणानंतर ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात आमदारांची धरपकड होत असताना आजच्या निष्ठा यात्रेत फारसे युवसैनिक दिसलें नाही. परंतु ज्या शिवसैनिकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे ते आदित्य ठाकरे यांचे स्वागत करताना दिसून आले.
ताफा थांबला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर - आदित्य ठाकरे यांचे यापूर्वीचे ठाणेदौरे पाहता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने मंत्री मुख्य पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात युवा सैनिक पाहायला मिळत होते. परंतु आजच्या दौऱ्या दरम्यान युवा सैनिकांसोबतच शिवसैनिकांचा देखील कमी संख्याबळ पाहायला मिळाले. शिवसेनेवर दावा करणाऱ्या दोन गटांपैकी तटस्थ शिवसेनेचे यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांचे ठाणे नगरीत स्वागत केले. स्वागताच्या दरम्यान शिवसैनिक रस्त्यात थांबलेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर देखील शिवसैनिक थांबल्याचे आढळून आले.
चर्चेला उधाण - आदित्य ठाकरे भिवंडीच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांना पाहून त्यांची भेट घेतली. परंतु, मुख्यमंत्र्याच्या घराबाहेर आदित्य ठाकरे थांबल्याचे पाहून राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आहे. भविष्यात राजकीय घडामोडीत कलाटणी येताना दिसून येत असले तरी आताच्या सत्ता संघर्षावरून एकनाथ शिंदे व आदित्य ठाकरे चांगलेच चर्चेत आहेत.
हेही वाचा -Aaditya Thackeray : शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना, 'शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी...'