ठाणे -एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत असून ठाणेकर नागरिकांना लस मिळणे कठीण झाले आहे. अशातच दुसरीकडे नोंदणी न करता नियम डावलून एका महिला सेलिब्रिटीने लस घेतल्याचे उघड झाले आहे. ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे असलेल्या रुग्णालयात ही लस देण्यात आली. या अभिनेत्रीने कोविड सेंटरची फ्रंट लाईन वर्कर म्हणून खोटे ओळखपत्र बनवण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या अभिनेत्रीला ही लस कोणी दिली? आणि कशी दिली? हा संशोधनाचा विषय असला तरी नियमबाह्य लस दिल्याने पालिका प्रशासन चांगलेच गोत्यात येणार आहे.
हेही वाचा -शाब्बास रे पठ्ठ्या..! आदिवासी तरुणाला गुळवेल पुरविण्याचे १.५ कोटींचे मिळाले कंत्राट
- सर्वसामान्यांना लसीसाठी प्रतीक्षा
गेल्या अनेक दिवसांपासून लसीचा तुठवडा जाणवत आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना लसीपासून मुकावे लागत आहे. काही ठिकाणी लसीकरणासाठी वेंटिंग करावे लागत आहे. मात्र, मीरा चोप्रा या अभिनेत्रीला थेट लस कशी देण्यात आली? असा प्रश्न आता विरोधक विचारत आहेत. तसेच चुकीच्या पद्धतीने ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधित एजेन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.