ठाणे :शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला काल पोलिसांनी ( Thane Police ) अटक केली ( Ketaki Chitale Arrested ) होती. आज तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ( Ketaki Chitale to police custody ) आहे. केतकी हिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायाधीश वी वी राव यांच्या कोर्टात सुनावणी घेण्यात आली.
केतकी न्यायालयात म्हणाली की, मी माझी बाजू स्वतः मांडणार आहे. मी जे काही बोलले तो माझा अधिकार आहे. मी जे काही पोस्ट केले तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी कोणी राजकीय व्यक्ती नाहीये. मी राजकीय लीडर नाहीये. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. बोलण्याचे लिहिण्याचे स्वातंत्र्य नाहीये का? मी काही मास लिडर नाहीये की माझ्या काही लिहिण्याने कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. मी केलेली पोस्ट खुशीने आणि मर्जीने केलीये, असे ती म्हणाली. तिने इंग्रजीतून युक्तिवाद केला. तत्पूर्वी न्यायालयाने केतकी हिला तुमचा वकील कोण आहे? अशी विचारणा केली. मात्र मी वकील लावलेला नसून, माझा युक्तिवाद मी स्वतः करणार असल्याचे तिने सांगितले.
या मुद्द्यांवर केतकीला मिळाली पोलीस कोठडी : केतकीच्या विरोधात ठाणे गुन्हे शाखेतर्फे न्यायालयासमोर म्हणणे मांडण्यात आले. क्राईम ब्रांचने तिच्या पोलीस कोठडीची मागणी केली. केतकीने केलेली पोस्ट तिने का केली?, कोणाच्या सांगण्यावरून केली?, या मागे कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे, केतकीचा मोबाईल जप्त केलाय, लॅपटॅाप जप्त करने बाकी आहे, असे म्हणत पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.
केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काल देखील नवी मुंबई येथे त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिलांनी हल्ला केला होता. त्यातच आजदेखील केतकी चितळे यांना न्यायालयात आणल्यानंतर राष्ट्रवादी महिलांकडून घोषणाबाजी व रस्त्यावर अंडी फेकून निषेध करणात आला. आता केतकी चितळे यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट च्या संधर्भात पोलिस चौकशी करतीलच. परंतु महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या तक्रारींना देखील केतकी चितळे हिला सामोरे जावे लागणार आहे. आज न्यायालयात केतकी चितळेला हजर केल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना त्याठिकाणी आंदोलन करता आले नाही आणि म्हणूनच या महिला कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या बाहेर रस्त्यावर ती अंडी फोडून केतकी चितळेचा निषेध केला.
हेही वाचा : ink Throw on Ketaki Chitale : पवार समर्थकांनी केली केतकीवर शाईफेक