महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ketaki Chitale Jail Release : अभिनेत्री केतकी चितळे तुरुंगातून बाहेर; म्हणाली, जय हिंद जय महाराष्ट्र

अभिनेत्री केतकी चितळे ( Actress Ketaki Chitale ) आज जामीन मिळाल्यानंतर ठाणे कारागृहाच्या बाहेर आली ( Ketaki Chitale Jail Release ) आहे. बाहेर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे हास्य हे पाहण्याजोगे होते. तिने बाहेर आल्यानंतर अजून न्याय मिळणे बाकी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आणि आपल्या वडिलांच्या गाडीने जी आपल्या घराकडे निघाली.

Jai Hind Jai Maharashtra
अभिनेत्री केतकी चितळे तुरुंगातून बाहेर

By

Published : Jun 23, 2022, 8:27 PM IST

Updated : Jun 23, 2022, 9:12 PM IST

ठाणे -अभिनेत्री केतकी चितळे आज जामीन मिळाल्यानंतर ठाणे कारागृहाच्या बाहेर आली ( Ketaki Chitale Jail Release ) आहे. बाहेर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे हास्य हे पाहण्याजोगे होते. तिने बाहेर आल्यानंतर अजून न्याय मिळणे बाकी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आणि आपल्या वडिलांच्या गाडीने जी आपल्या घराकडे निघाली. शरद पवारांच्या विरोधात अपक्षेपार्ह पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला अखेर ठाणे न्यायालयाने २० हजाराच्या जातमुचकल्याचा जामीन मंजूर केला. अखेर केतकीला शरद पवार आणि रबाळे पोलीस ठाण्यातील एक्ट्रोसिटीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्याने केतकीला घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

अभिनेत्री केतकी चितळे तुरुंगातून बाहेर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात केतकी चितळे हिने आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकल्याने एकाच खळबळ उडाली होती. कळवा पोलीस ठाण्यात केतकी चितळेच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या सोबतच अनेक पोलीस ठाण्यात केतकी चितळे हिच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. ठाणे गुन्हे शाखेने केतकी चितळेला अटक केली. तिचे मोबाईल, लॅपटॉप सायबर विभागाने तपासले. मात्र न्यायालयातच केतकी चितळे हिने आपण स्वतः पोस्ट टाकल्याची कबुली न्यायालयात स्वतः दिलेली होती.

१४ मे ते २२ जून पर्यंतचा केतकी कोठडी प्रवास -कळवा पोलीस ठाण्यात केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने केतकी चितळेला १४ मे रोजी कळंबोली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीची प्रवास केतकी चितळेचा सुरु झाला. त्याला २२ जून, २०२२ रोजी ठाणे न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर फुलस्टॉप लागला. शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट टाकल्या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात केतकी चितळे हिला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर २०२० मध्ये केतकीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात एक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात केतकीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर ना पुन्हा अर्ज केला. नाही, रबाळे पोलिसांनी अटक केली. मात्र शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच रबाळे पोलिसही अटक करण्यात पुढे आले. त्यांनी केतकी चितळे यांचा ताबा घेतला. त्यानंतर आठवड्यापूर्वी केतकीला एक्ट्रोसिटीच्या गुन्ह्यात २५ हजाराच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र कळवा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत होती.

२० हजाराच्या जातमुचकल्याच्या जामिनावर मुक्तता -कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या केतकी चितळे हिच्या वकिलाने ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर ठाणे न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने २० हजाराच्या जातमुचकल्याच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिल्याने केतकीचा न्यायालयीन कोठडीतून सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा -Sanjay Raut Appeal to Eknath Shinde : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा - राऊतांचे शिंदेंना आवाहन

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार बहूमत सिद्ध करेल, शरद पवार यांची प्रतिक्रिया

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार कोसळणार? पाहा तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया...

Last Updated : Jun 23, 2022, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details