महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Actress was cheated : चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून अभिनेत्रीची फसवणूक - अभिनेत्री धनश्री भालेकरची फसवणूक

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून नवोदित कलाकारांची आर्थिक लुबाडणूक करण्याचे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. (Actress Dhanashree Bhalekar was cheated) दररोज ऑनलाइन ट्रान्जॅक्शन संदर्भातली फसवणूक समोर येत आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री धनश्री भालेकरला बेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री धनश्री भालेकर
अभिनेत्री धनश्री भालेकर

By

Published : Feb 22, 2022, 9:00 AM IST

ठाणे - चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून नवोदित कलाकारांची आर्थिक लुबाडणूक करण्याचे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. दररोज ऑनलाइन ट्रान्जॅक्शन संदर्भातली फसवणूक समोर येत आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री धनश्री भालेकरला बेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. (Actress Dhanashree Bhalekar) धनश्रीने फेसबुकच्या माध्यमातून आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीचा घटनाक्रम तिने शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्री धनश्री भालेकर प्रतिक्रिया

तुमची निवड बालाजी टेलीफिल्म्सच्या एका वेबसिरीजसाठी झाली

धनश्री भालेकर हिने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, (डिसेंबर २०२१)रोजी कास्टिंग अक्टिंगसाठी बालाजी टेलीफिल्म्स यांच्याकडून मेल आला आणि त्या मेलमध्ये अस सांगण्यात आले की, तुमची निवड बालाजी टेलीफिल्म्सच्या एका वेबसिरीजसाठी झाली असून या वेबसिरीजचे शुटींग मुंबई आणि हैदराबाद मध्ये होणार आहे. (Actress Dhanashree Bhalekar was cheated) ती वेबसिरीज (zee ५)वर दिसणार आहे. आणि या संदर्भातील करार करण्यासाठी तुम्हाला मुंबईतील ऑफिस येथे याव लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर धनश्रीने मेल द्वारे त्यांना कागदपत्रे पाठवली.

दराबादला तुम्हाला विमानाने प्रवास करायचे आहे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफिस बंद करण्यात आले असल्याने त्यांच्यासोबत फोनवरच माझ बोलण सुरु होते. मुंबईचे ऑफिस बंद असल्यामुळे ऍग्रिमेंट प्रोसेस हैदराबाद येथे होणार असल्याचे सांगण्यात आले. करार करायाला तुम्हाला उशीर होत असल्याने हैदराबादला तुम्हाला विमानाने प्रवास करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला तिकीट बुक करावी लागेल अस सांगण्यात आले. पुढे सांगण्यात आले की बालाजी २० असे प्रोमोकोड देऊ आणि इंडीगो या विमानाने प्रवास करायचे आहे.

तुमचा तिकीट बुकिंगचा पेमेंट झाले

काही तांत्रिक अडचणींमुळे प्रोमोकोड अप्लाय होत नसल्यामुले संपर्क साधला असता अस सांगण्यात आले की, ईंडीगोकडून तुम्हाला फोन येईल आणि काही वेळाने ईंडीगोकडून फोन आला आणि तिकीट बुकिंग झाल्याचे सांगितले. तुमचा तिकीट बुकिंगचा पेमेंट झालं नसल्याने त्यांच्याकडून एक गुगल पे नंबर देण्यात आला. आणि या नंबरवर २,३४८ रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच इंडिगोकडून पुष्टीकरण करण्यासाठी मेल देखील आला. प्रोमोकोड मध्ये प्रोब्लेम येत असल्याने तुमचा रात्री ८ वाजेपर्यंत सर्व ठीक होईल अस सांगण्यात आले.

कास्टिंग अक्टिगसाठी फोन केला होते

१० फेब्रुवारीला सकाळी १०.४५ वाजता विमानाची तिकीट असल्याने मी, ९ फेब्रुवारीच्या रात्री त्यांना फोन केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. कास्टिंग अक्टिगसाठी फोन केला होते ते अनिकेत कुमार त्यांना देखील फोन केला असता मला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच तुम्ही कोणीच फोन उचलत नसल्याने पोलिस तक्रार करेन अस म्हणाले असता दुसऱ्या दिवशी त्यांचा केलेल्या मेसेजला उत्तर आल होत फक्त wait. या व्यतिरिक्त त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे

डोमेन बालाजीच असल्याने मी बालाजीच्या ऑफीसमध्ये या संदभार्त माहिती दिली. तेथे मला सांगण्यात आले की, हे फोन नंबर किंवा नावे ओळखीची नसल्याने या संदर्भात आयटी सेल कडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. डोमेन बालाजी टेलिफिल्म्सचं असल्याने नक्की सत्य काय याबाबत काहीच खात्री अद्याप झालेली नाही. परंतु या संपूर्ण प्रकरणावरून अभिनेत्री धनश्री भालेकर हिने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धनश्री म्हणाली कि जी गोष्ट माझ्याबरोबर झाली ती इतर कोणासोबतही होऊ नये यासाठी मी हा व्हिडीओ बनवला आहे.

हेही वाचा -रशियाने दोन फुटीरतावादी प्रदेशांना स्वातंत्र्याची मान्यता दिल्याने वाद चिघळला; आज सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details