ठाणे - भारताला 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे ( 75 years of independence ) पूर्ण झाली. देशात 75 वर्षांच्या निमित्ताने आझादी का अमृत अमृत महोत्सव या टॅगलाईन खाली वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज आपण 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे नाव उंचवणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर माया राठोड.
डॉक्टरांना मानवरूपी देव मानले जाते. रुग्णांवर उपचार करताना हेच डॉक्टर मानवासाठी देवाच्या रुपाने सेवा करत असतात. त्यामुळे डॉक्टरांना विशेष महत्त्व आहे. मात्र, हेच डॉक्टर रुग्णांची सेवा करताना स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकत नाहीत. तसेच त्यांच्या स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत असते. मात्र, सगळेच डॉक्टर असे नसतात. अशाच एका डॉक्टरची कहाणी आज विशेष आहे. डॉक्टर माया राठोड (Dr. Maya Rathod) या बॉडी बिल्डर (Woman Doctor Body Builder) बनल्या आहेत. त्यांनी या क्षेत्रात मोठे नाव देखील कमावले आहे.
विरोध झुगारून बॉडी बिल्डिंग सुरूच ठेवली - ठाणेकर डॉक्टर असलेल्या माया राठोड (Dr. Maya Rathod) मुलीने अनेक वाईट परिस्थितीवर मात करत डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. ते करत असतानाच बॉडी बिल्डिंगसाठी (Woman Doctor Body Builder) अनेक विरोध झाल्यानंतरही तिने बॉडी बिल्डिंग सुरूच ठेवली. कुटुंबातून विरोध झाला. सर्व विरोधाला न जुमानता बॉडी बिल्डिंग सुरू ठेवली. या डॉक्टरने बॉडी बिल्डिंगमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. एवढंच नाहीतर या महिला डॉक्टरवर एक बायोपिक देखील येत आहे. या महिला डॉक्टरचा आव्हानात्मक जीवनप्रवास आहे आणि यातून अनेकांना प्रेरणा देखील मिळू शकते.