ठाणे : देशाच्या पंचात्तराव्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाने 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) मोहीम देशभर राबवण्याचे ठरविले आहे. या मोहिमेअंतर्गत यावर्षी मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंड्यांची खरेदी-विक्री सुरु झाली आहे. झेंडा खरेदी विक्रीसाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असल्या तरी, तिरंगा झेंडा बनविणाऱ्या कारखानदाराला हजारो झेंड्यांचे ऑर्डर मिळत (thanks to Har Ghar Tiranga campaign) असल्याने; त्यांचे 'अच्छे दिन' (Achhe Din for flag makers) आल्याचे दिसून येत आहे.
दि फ्लॅग शॉप’ या कंपनीचा झेंडे बनविण्याचा कारखाना :भिवंडीतील दापोडा येथील, साई धाम कॉम्पलेक्समध्ये ‘दि फ्लॅग शॉप’ या कंपनीचा झेंडे बनविण्याचा कारखाना आहे. स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून 'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे या कारखानातील कामगार सध्या तिरंगा झेंडा बनविण्यात प्रचंड व्यस्त आहेत. त्यातच काही कामगार बाहेरगावी तर काही कामगार कंपनीच्या दुसऱ्या कारखान्यात गेल्याने भिवंडीतील कारखान्यात सचिन गमरे व सिराज उलहक हे दोन कामगार झेंडा बनविण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे :'दि फ्लॅग शॉप’ या कंपनीत २ बाय ३ इंच, तसेच ४ बाय ६ इंच पासून ते ४८ बाय ७१ फूट, तसेच ६० बाय ९० फुटांपर्यंतचे लहान मोठे असे सर्वच तिरंगा झेंडे बनविले जात आहे. २ बाय ३ फूट ते ४ बाय ६ फुटाच्या मोजमापाचे सुमारे २०० ते ३०० तिरंगा झेंडे या कारखान्यात दिवसाला बनविले जातात. तर मोठे झेंडे एका दिवसात आठ पर्यंत बनविण्यात येत असल्याची माहिती येथील कामगारांनी दिली आहे.