ठाणे - शेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात डांबून बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी ७ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना मार्च २०१८ रोजी भिंवडीत घडली होती. इशरत सर्फराज अन्सारी असे कारावासाची शिक्षा ठोठवलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पीडित मुलीने आरोपीच्या आई व भावाला घटनेची माहिती देऊनही उलट तिलाच धमकावून घरात बेकायदेशीररित्या रात्रभर डांबून ठेवल्याच्या गुन्ह्यात त्यांनाही शिक्षा सुनावली आहे. यामध्ये अत्याचार करणाऱ्यास ७ वर्ष सश्रम कारावासाची तर धमकावून घरात बेकायदेशीररित्या डांबल्याप्रकरणी तिघांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.
आरोपीच्या आई व भावाची पीडित मुलीला धमकी -
पीडित मुलगी ही १६ वर्षीय असून ती, तिच्या भावाकडे राहण्यासाठी भिवंडीत आली होती. याचदरम्यान २८ मार्च २०१८ रोजी दुकानात जात असताना त्याच परिसरात राहणाऱ्या इशरत सर्फराज अन्सारी याने तिला त्याच्या घरात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तिला मारण्याची धमकी देऊन घरात डांबून ठेवले. त्यानंतर घरी आलेल्या आरोपीची इशरतची आई निलोफर आणि भाऊ अर्शद या दोघांना पीडित मुलीने झालेला प्रकार सांगितल्यावर त्यांनीही तिला धमकावून रात्रभर घरात बेकायदेशीररित्या डांबून ठेवले. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी अर्शद याने तिला घरातून बाहेर मुख्य रस्त्यावर सोडले.
आठ साक्षीदारांची साक्ष आणि सादर केलेल्या पुराव्यामुळे शिक्षा -