महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनसे नेते जमील शेख हत्या प्रकरण : आरोपीला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी - मनसे नेते जमील शेख हत्या प्रकरण

मनसे पदाधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते जमील शेख हत्या प्रकरणात आरोपी इरफान सोनू शेख मनसुरी यास ठाणे न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

police
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 5, 2021, 5:16 PM IST

Updated : Apr 5, 2021, 7:04 PM IST

ठाणे -ठाण्याच्या राबोडीत २३ नोव्हेंबर २०२० रोजी दिवसाढवळ्या मनसे प्रभाग अध्यक्ष आणि आरटीआय कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, ठाणे पोलिसांनी यापूर्वीच एका आरोपीला अटक केली होती. मात्र, गोळ्या झाडणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश एसटीएफ आणि ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने लखनऊ येथून अटक केली. आरोपी इरफान याला सोमवारी ठाणे न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपीला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

हेही वाचा -जमील शेख यांची हत्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या वदातून - अविनाश जाधव

15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

जमील शेख यांच्या हत्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी हत्येच्यावेळी दुचाकी चालविणारा आरोपी शाहिद शेख याला अटक केली आहे. तो सध्या कारागृहात बंदिस्त आहे. मात्र जमीलच्या हत्येत फरारी आरोपी इरफान सोनू शेख याला उत्तरप्रदेश एसटीएफ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने लखनऊ येथून ३ एप्रिल रोजी अटक केली. त्यानंतर आरोपी इरफानला विमानाने मुंबईत आणण्यात आले. तर ठाणे गुन्हे शाखेने आरोपी इरफान सोनू शेख याला सोमवारी ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर ठाणे न्यायालयाने इरफानला ११ दिवसाची पोलीस कोठडी म्हणजेच १५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -मनसे पदाधिकारी जमील शेख हत्याकांडातील आरोपी लखनऊमधून जेरबंद; नेत्याने सुपारी दिल्याची कबुली

चौकशीत स्पष्ट होणार हत्येचे कारण

उत्तर प्रदेशमध्ये आरोपी इरफान सोनू शेख याला न्यायालयात ट्रान्झिस्ट रामन मंजूर करून ठाणे गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले. मात्र एसटीएफने घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये सुपारी वाजवणारा आरोपी हा इरफान सोनू शेख असून त्याला २ लाखाची सुपारी ओसमा नावाच्या तरुणाने दिल्याचे स्पष्ट केले. सुपारी एका नगरसेवकाने दिल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. मात्र आरोपी इरफान शेख याला ११ दिवसाची कोठडी मिळाल्याने पोलीस अधिक चौकशी करतील. यात जमील हत्या प्रकरणाची सर्व माहितीची उकल करणार आहेत. हत्यासाठी सुपारी कोणी दिली? सुपारी कोठे दिली ठाण्यात की उत्तरप्रदेशात? रक्कम किती? कुणी व कुणाला दिली? आदी प्रश्नांची उत्तरे लवकरच ठाणे गुन्हे शाखा मिळवणार आहे. येणाऱ्या काही दिवसातच जमील शेख यांच्या हत्येचे धागेदोरे आणि सूत्रधारांची उकल होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Apr 5, 2021, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details