ठाणे -कल्याणमध्ये २९ ऑक्टोंबरला रात्री साडेदहा वाजता एका व्यावसायिकावर गोळीबार करून दोन अज्ञात हल्लेखोर फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. मुद्स्सर मजीद असे गोळीबारात जखमी झालेल्या केबल व्यवासायिकाचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त तपास करून २ शुटरसह त्यांच्या ३ साथीदारांना आणि सुपारी देणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
व्यावसायिकावर गोळीबार करणारे शुटरसह साथीदार गजाआड धक्कादायक बाब म्हणजे मुद्स्सर हा आरोपी इस्माईलच्या बहिणीला नीट वागवत नव्हता. तो तिला मारहाण करून मानसिक त्रास देण्यासाठी त्याने एका बारबालाशी अनैतिक संबध ठेवले आहे. यामुळे मुद्स्सर यांचा काटा काढण्यासाठी आरोपी इस्माईलने सुपारी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
मुनवर शेख, इरशाद कुरेशी ( दोघेही रा. राबोडी,ठाणे) तर शहाबाज पोके, आफताब शेख, निहाद करेल, (तिघे रा. कोनगाव, भिवंडी) इस्माईल मांडेकर (रा. कल्याण) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी इस्माईल मांडेकर हा जखमी मुद्स्सर मजीद यांचा मेव्हणा असून त्यानेच २ शुटर व त्यांच्या साथीदाराला ५ लाखांची सुपारी दिल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे.
कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात राहणारे केबल व्यावसायिक मुद्स्सर मजीद हे २९ ऑक्टोंबरला रात्री साडे नऊच्या सुमारास एक रिक्षात बसून उल्हासनगरच्या दिशेने जात होते. त्यावेळी वालधुनी पूल ओलांडल्यानंतर मुद्स्सर यांनी आपली रिक्षा थांबवून रिक्षा चालकाला समोरच्या दुकानातून एक सिगारेट आणण्यास सांगितले. याच दरम्यान पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात शुटर तोंडवार रुमाल बांधलेले होते. या हल्लेखोरांनी त्याच्यावर पाळत ठेवून जवळ येताच त्यामधील एका शूटरने मुद्स्सर वर गोळीबार केला. गोळीबारात मुद्स्सर जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्याचे पाहून हल्लेखोर फरार झाले होते. मुद्स्सर यांच्या हाताला पायाला दोन गोळ्या लागल्या होत्या.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले होते. त्या फुटेजमध्ये गोळीबार करणारे हल्लेखोर पल्सर दुचाकीवरून येताना दिसत होते. त्यांनतर पोलिसांनी जखमी मुद्स्सर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यामध्ये मुद्स्सर हा आरोपी इस्माईलच्या बहिणीला नीट वागवत नव्हता. तो तिला मारहाण करून मानसिक त्रास देण्यासाठी त्याने एका बारबालाशी अनैतिक संबध ठेवले आहे. यामुळे मुद्स्सर यांचा काटा काढण्यासाठी आरोपी इस्माईलने सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून मुनवर शेख, इरशाद कुरेशी या शुटरांनी गोळीबार केला. तर शहाबाज पोके, आफताब शेख, निहाद करेल, या तीन आरोपीने जखमी मुद्स्सर वर रिक्षामध्ये पाळत ठेवून शूटरला मदत केली. इस्माईल मांडेकर याने बहिणीच्या नवऱ्याला मारण्याची ५ लाखाची सुपारी दिल्याचे उघडकीस आल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली.