ठाणे - लोकल डब्याच्या (Local Train) दारात उभे राहून दोन जण प्रवास करत होते. यावेळी थुंकण्याच्या वादातून जाब विचारणाऱ्या प्रवाशाला दुसऱ्याने धावत्या लोकलमध्ये आणि त्यानंतर रेल्वे स्थानकात दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना आंबिवली रेल्वे स्थानकात (Ambivli railway station) घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हल्लेखोर प्रवाशाला अटक केली आहे. हरिकेशकुमार राजभजन राय (वय ३३, रा. बनेली टिटवाळा ) असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर अविनाश भारत ढिवरे (वय १८, रा. अटाळी, आंबिवली) असे मारहाणीत जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
लोकलमध्ये थुंकण्याच्या वादातून प्रवाशाला दगडाने मारहाण; हल्लेखोर प्रवासी अटकेत - लोकलमध्ये प्रवाशाला दगडाने मारहाण
लोकल डब्याच्या (Local Train) दारात उभे राहून दोन जण प्रवास करत होते. यावेळी थुंकण्याच्या वादातून जाब विचारणाऱ्या प्रवाशाला दुसऱ्याने धावत्या लोकलमध्ये आणि त्यानंतर रेल्वे स्थानकात दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना आंबिवली रेल्वे स्थानकात (Ambivli railway station) घडली आहे.
थुंकण्यास मनाई केल्याने आला राग -जखमी अविनाश व हल्लेखोर हरिकेशकुमार हे दोघेही मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आसनगाव लोकलने लगेज डब्बाच्या लागून असलेल्या डब्यातील दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. त्यावेळी लोकल शहाडहून आंबवली रेल्वे स्थानकात येत होती. त्यावेळी हरिकेशकुमार हा वारंवार थुंकत असल्याने त्याचा थुंका अविनाशच्या अंगावर उडत होता. त्यामुळे त्याला अविनाशने थुंकण्यास मनाई केली. याचाच राग येऊन धावत्या लोकलमध्ये हरिकेशकुमारने अविनाशला मारहाण केली.
रेल्वे स्थानकातही केली मारहाण -लोकल आंबिवली रेल्वे स्थानकातील १ नंबर फलाटावर थांबताच हरिकेशकुमारने अविनाशला धक्का देऊन फलाटावर पाडले. त्यानंतर फलाटावरच पुन्हा मारहाण केली. मारहाण सुरु असताना फलाटावरील दगड उचलून अविनाशच्या पायावर मारला. या मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुसरीकडे काही प्रवाशांच्या मदतीने हल्लेखोराला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मोहिते करीत आहेत.