महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रस्त्यांची दुर्दशा,  खड्ड्यांमुळे आतापर्यंत ९ जणांचा अपघातात मृत्यू

ठाणे जिल्ह्यात खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ५ जुलै रोजी भाईंदर येथील काजूपाडा येथे खड्ड्यांच्या त्रासामुळे एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्ह्याच्या इतर भागात खड्ड्यांचा अडथळा आल्याने इतर वाहनांच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. (Chief Minister Eknath Shinde) रविवारी (दि. २९ ऑगेस्ट ) रोजी रात्रीच्या सुमारास दिवा आगासन येथे गणेश विठ्ठल फले ( २२ )  या तरुणाचा खड्ड्यात दुचाकी गेल्याने दुचाकीस्वार खाली पडून ट्रकखाली सापडल्याने घटना घडली आहे. ठाण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा जिल्हा बालेकिल्ला असल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत.

ठाणे जिल्यात खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल
ठाणे जिल्यात खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल

By

Published : Aug 30, 2022, 7:27 PM IST

Updated : Sep 1, 2022, 6:21 PM IST

ठाणे - दिव्यात पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्ते प्रवृत्तीने मूलभूत सुविधांपासून दिवावासी हा वंचित आहे. त्यातच रस्त्याची तर चाळण झाल्याची परिस्थिती सद्या दिसून येत आहे. ( Bad roads in Thane ) रस्त्यावरील खड्ड्यांत दुचाकी अडकून झालेल्या अपघातात पाले या तरुणांचा मृत्यू झाल्याने दिव्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे पितळ आता उघडे पडले आहे. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून रस्त्याचे काम करणाऱ्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्तित झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकाराला ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

प्रशासनाला जाग कधी येणार - ठाणे शहराची स्मार्टसिटी शहरात गणना केली गेली जात असून रस्त्यावर कोट्यवधींची कामे करण्यात आली आहेत. याच ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्यांची दुरावस्था असतानाच दुर्लक्षित असलेल्या दिव्यात तर परिस्थिती ही "सांगताही येत नाही आणि सहन ही होत नाही" अशी झाली आहे. एकीकडे ठाणे पालिका स्मार्टसिटी अंतर्गत पुरस्कार घेत आहेत. (Accidental death of 9 people in Thane district) तर दुसरीकडे रस्त्यांची चाळण झाल्याने खड्डे यमदूत ठरत आहेत. गेल्या काही दिवसांत कोपरी आणि दिव्यात दोन तरुणांचा जीव गेला. मात्र, प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल आता उपस्तित केला जात आहे.

ठाणे जिल्यात खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल

१८३ कोटीचा निधी; तरीही रस्त्याची कामे रखडलेली -ठाण्यातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, यासाठी शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने ठाणे महापालिकेला १८३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये सिमेंट काँक्रिट, डांबरीकरण आणि युटीडब्लुटी पद्धतीने रस्ते करण्याच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ कागदी घोडेच नाचवण्यात आले असून ठाण्यातील १२७ रस्त्याची कामे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेली आहेत. ( potholes on roads in Thane district ) गेल्या सहा वर्षांमध्ये ठाणे महापालिकेने रस्त्यांवर १ हजार ३२१ कोटी रूपये खर्च केला आहे. ठाणे महापालिकेकडून रस्त्यांवर अमाप खर्च होत असतानाही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांचा बळी जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज ठाणेकर आपला जीव गमवत आहेत.

नरेश म्हस्के माजी महापौर

निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- निकृष्ट काम व खड्ड्यामुळे अपघात होऊन एका तरुणाचा जीव गेल्याने दिवा आगासन रस्त्याचा ठेकेदार व पालिका अभियंत्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार दिवा भाजपने मुंब्रा पोलिसांची भेट घेऊन केली आहे. या रस्त्याचे मागील पाच वर्षापासून काम सुरू आहे. अतिशय संथगतीने या रस्त्याचे काम सुरू असून ते नियमित होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने काम या ठिकाणी झाल्याच्या तक्रारी देखील वारंवार अनेक नागरिकांनी केल्या आहेत. त्याचबरोबर गणेश नगर, बेडेकर नगर, आगासन पट्ट्यामध्ये या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम व अर्धवट कामाचा फटका एका तरुणाला बसला असून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे गणेश उत्सवाच्या तोंडावर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यामुळे सदर तरुणाचा हकनाक जीव गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर, संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दिवा भाजपने केली आहे.

ठाणे जिल्यात खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल

कोट्यवधी रूपये खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा - स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या ठाणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तर, गेल्या सहा वर्षात रस्त्यांवर केला गेलेला १३०० कोटींचा खर्च असो किंवा गेल्या दोन महिन्यांपासून १८३ कोटींच्या रखडलेल्या कामामुळे रविवारी कोपरी पुल परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. खड्ड्यामुळे ठाण्यातील अनेकांचा जीव जाऊनही प्रशासन मात्र कुंभकर्णासारखे झोपी गेलेले आहे. ठाणेकरांना सहन कराव्या लागणाऱ्या या त्रास विरोधात सोमवारी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मनपाच्या नगर अभियतांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट देऊन अनोखे आंदेालन करण्यात आले आहे.

खराब रस्त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या वतीने ठाण्यातील खराब रस्त्यांबाबत आवाज उठवला जात आहे. वारंवार निवेदन देऊनही ठामपा प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. रविवारी २७ वर्षाच्या तरूणाचा कोपरी येथे झालेल्या अपघातात खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. तेव्हा अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे? असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने ठाणे महापालिकेला केला जात आहे. एकीकडे स्मार्ट सिटीसाठी पुरस्कार मिळत असताना मात्र दुसरीकडे ठाण्यातील खराब रस्त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत.

ठाणे जिल्यात खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल

हेही वाचा -Maharashtra Crime NCRB Report 2021 महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा आढावा; मुंबई अव्वल स्थानी

Last Updated : Sep 1, 2022, 6:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details