ठाणे - एका पोलीस नाईकाला २० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीत रंगेहात पकडले. ही घटना मुंबई-नाशिक महार्गावरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका पोलीसचौकी नजीक घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून लाचखोराला बेड्या ठोकल्या आहेत. भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या लाचखोरच नाव आहे.
लाचखोर भरत जगदाळे हा पडघा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर आहे. तो मुंबई-नाशिक महामार्गवरील तळवली नाका पोलीस चौकीत कार्यरत होता. त्याने २१ सप्टेंबर जून रोजी तक्रारदार यांना त्यांच्या ताब्यातील वाहनावर कारवाई न करण्यासाठी व त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी ३० हजार रुपयांची मासिक हप्त्याची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. या संदर्भात तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस चौकीनजीक सापळा रचला होता.
चौकीतच २० हजाराची लाच घेताना पोलिसाला पकडले, ठाण्यातील तळवलीत लाचखोरीची घटना - भरत शरद जगदाळे
ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस चौकीत रंगेहात लाच घेताना पोलीस नाईकाला पकडले आहे. ही घटना मुंबई-नाशिक महार्गावरील भिवंडी तालुक्यातील तळवली नाका पोलीस चौकीजवळच घडली आहे. भरत शरद जगदाळे असे अटक केलेल्या लाचखोराचे नाव आहे.

चौकीतच २० हजाराची लाच घेताना पोलिसाला पकडले
पहाटे अडीचच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून तळवली नाका पोलीस चौकीजवळ पंचांसमक्ष लाचखोर भरत जगदाळे याने २० हजार रुपयांची लाच घेताना त्याला पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. याप्रकरणी तो कार्यरत असलेल्या पडघा पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत ठेवले आहे.
Last Updated : Sep 23, 2022, 3:35 PM IST