पश्चिम बंगाल बॉम्बस्फोटातील फरारी आरोपीला ठाण्यात अटक - ठाण्यात बंगालच्या आरोपीला अटक
पश्चिम बंगालच्या बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी हा ठाणे जिल्ह्यात ओळख लपवून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने ठाणे स्टेशन परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली.
ठाणे -पश्चिम बंगालच्या बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी हा ठाणे जिल्ह्यात ओळख लपवून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने ठाणे स्टेशन परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली.
आरोपीचे नाव मलीक फकीर मिर उर्फ नेया असे आहे. तो ठाणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळालेली होती. पोलिसांनी ठाणे स्टेशन परिसरात सापळा रचला आणि आरोपीला शिताफीने अटक केली. त्याच्या चौकशीत तो पश्चिम बंगालच्या बॉम्बस्फोटामधील फरारी आरोपी असल्याचे समोर आले. पोलिसांनी बासंती पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून माहिती घेतली असता ही माहिती सत्य असल्याचे समोर आले. तो सध्या पापडीपाडा, अरुण चक्कीवाला चाळ, तळोजा नवी मुंबई येथे ओळख लपवून राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हे शाखेने आरोपीला ठाणे न्यायालयात नेऊन त्याचा रिमांड घेतला. तसेच बसंती पोलीस ठाण्याला फरारी आरोपी सापडल्याचे सांगण्यात आले. पश्चिम बंगाल पोलीस आरोपीचा ताबा घेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.