ठाणे -मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत वक्तव्य केले ( Raj Thackeray Loudspeaker Issue ) होते. त्यानंतर मुंब्रा परिसरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानीने ( Abdul Shekhani Warning Raj Thackeray ) निदर्शने करीत 'छेडेंगे तो छोडेंगे नही', असा इशारा दिला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात शेखानी आणि अन्य 25 जणांविरोधात भादंवि १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत ठाणे न्यायालयाने शेखानीला 15 हजारांच्या जातमुचलावर जामीन मंजूर केला ( Abdul Shekhani Grants Bail Thane Court ) आहे.
राज ठाकरेंच्या विधानाला प्रतिउत्तर देताना शुक्रवारी अब्दुल मतीन शेखानीने कोणतीही परवानगी न घेता जनसभा घेतली. तसेच, 'छेडेंगे तो छोडेगे नही', असा इशारा देत मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक काडलक यांना निवेदन दिले. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी शेखानी याला १८८ नुसार नोटीस बजावून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.