ठाणे -मुंबईतील आरे येथील वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची रविवारी रात्री ठाणे कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. या सर्व आंदोलकांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेनंतर कारागृहाबाहेर जमलेल्या पर्यावरणप्रेमींनी यावेळी आनंद व्यक्त केला.
आरे येथील वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची, ठाणे कारागृहातून सुटका हेही वाचा... 'आरे'मधील आणखी झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
आंदोलकांच्या सुटकेनंतर पर्यावरणप्रेमींचा जल्लोष
आरेमधील वृक्षतोडीच्या निषेधार्थ आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २५ आंदोलकांची रविवारी सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये आदिवासी महिलांचाही समावेश आहे.
हेही वाचा... 'आरे'तून अटक करण्यात आलेल्या 29 निदर्शनकर्त्यांना जामीन मंजूर
आरे कन्झर्वेशन ग्रुप सुटकेसाठी केले प्रयत्न
आरेतील दीड हजार झाडे रातोरात कापून टाकण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. यानंतर शनिवारी आरे परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली होती. यापैकी २५ आंदोलकांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. रविवारी रात्री सव्वा बारा वाजता या आंदोलकांची सुटका करण्यात आली. यावेळी तुरुंगाबाहेर असलेल्या पर्यावरणवाद्यांनी या आंदोलकांची गळाभेट घेऊन जल्लोष करत स्वागत केले.