नवी मुंबई -सिवूड्समध्ये असलेल्या ग्रँड सेंट्रल माॅल बाहेर एका तरुणावर कोयत्याने काही व्यक्तींनी हल्ला केला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
तरुणावर हल्ला होतानाचे दृश्य हेही वाचा -चांदणी डान्स बारवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापा; १७ बारबालांसह ४० जण ताब्यात
ग्रँड सेंट्रल माॅल बाहेरून ब्रिजेश पाटील हा तरुण जात होता. मात्र, भर चौकात काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला चढवला व त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ब्रिजेश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मॉलमधील कामाच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती
प्राथमिक माहितीनुसार, ग्रँड सेंट्रल मॉलमधील माथाडी कामाच्या वादामुळे हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिलिंद भोईर, मनोहर नाईक व त्यांचे इतर चार साथीदार यांच्या विरोधात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. भर वस्तीत व भर चौकात झालेल्या या हल्यामुळे नवी मुंबईतील नागरिक सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थिती करत आहेत.
हेही वाचा -रेल्वे सुरक्षा यंत्रणा सदृढ करण्याची गरज; महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी