महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shocking Crime in Thane : टायरमध्ये हवा भरणारा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसविल्याने तरुणाचा मृत्यू - A young man died in Bhivandi

भिवंडी शहरातील सिल्क मिल्स लूम कारखान्यात ( Youth death in Bhivandi Silk Mills factory ) अब्दुल मन्सूरी या तरुणाचा हवा पोटात भरण्यात आल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ( Nijampur Police arrest to two labors ) ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

निजामपूर पोलीस ठाणे
निजामपूर पोलीस ठाणे

By

Published : Dec 2, 2021, 4:40 PM IST

Updated : Dec 2, 2021, 10:30 PM IST

ठाणे - मित्रांच्या थट्टेमुळे भिवंडीमधील कामगाराचे प्राण गेले आहेत. मोठ्या वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनचा पाईप तरुणाच्या गुदव्दारात लावून पोटात हवा ( youth death due to compressor pressure pipe ) भरण्यात आली. या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अब्दुल रफिक मन्सुरी (वय ३२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

भिवंडी शहरातील सिल्क मिल्स लूम कारखान्यात अब्दुल मन्सूरी या तरुणाचा हवा पोटात भरण्यात आल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत.

हेही वाचा-भिवंडीत पोलिसांच्या छाप्यात 40 बांग्लादेशी नागरिकांचे वास्तव उघड



कारखान्यात थट्टा मस्करी सुरू असतानाच घडला प्रकार
अब्दुल हा भिवंडीतील खाडीपार भागातील एका चाळीत राहत होता. त्याच भागात असलेल्या सिल्क मिल्स लूम कारखान्यात लूम कामगार म्हणून कार्यरत होता. तर दोन्ही आरोपीही याच लूम कारखान्यात ( Loom labor death in Bhivandis loom factory ) लूम कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यातच २६ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजल्याच्या सुमारास अब्दुल व आरोपींची कारखान्यात थट्टा सुरू होती. त्यातूनच दोघा आरोपींनी कारखान्यात असलेल्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनचा पाईप अब्दुलच्या गुदव्दारात घुसविला. त्यानंतर मशीन सुरू केली. त्यावेळी गुदव्दारावाटे हवा प्रेशरने पोटात जाऊन आतड्याना गंभीर ( death due to Pipe in private part ) दुखापत झाली होती. भिवंडीतील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा १ डिसेंबर २०२१ रोजी मृत्यू झाला. थट्टा करण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू ( labor death while friends kidding in Bhivandi ) झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा-Minor Girl Abuse : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सोशल मीडियावरील चॅटिंगमधून घडला प्रकार

आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी-
याप्रकरणी मृत तरुणाचा साडू शबोउद्दीन मन्सुरी यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभार करीत आहेत.

हेही वाचा-Booster Dose Need for Omicron : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'बूस्टर डोस' आवश्यक: तज्ज्ञ

Last Updated : Dec 2, 2021, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details