महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

थरारक..! ठाण्यातील रस्त्यावर अचानक पेटली दुचाकी; जीवितहानी नाही - ठाणे बातमी

ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ह्युंदाई शोरूम समोर दुचाकीने पेट घेतली. या घटनेत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.

ठाण्यात रस्त्यावर दुचाकीने घेतली पेट

By

Published : Oct 10, 2019, 9:29 AM IST

ठाणे - ठाण्यातील तीन हात नाका परिसरातल्या ह्युंदाई शोरूम समोर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. इंजिनला लागलेल्या आगीने क्षणातच पेट्रोलच्या टाकीला विळखा घातला. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली.

ठाण्यात रस्त्यावर दुचाकीने घेतली पेट

दिवसेंदिवस वाहनांनी पेट घेण्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी दुपारीही दुचाकी पेटल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी या रस्त्यावरची वाहतूक बंद करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली होती. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details