महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Railway : ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड; भियांत्रिक पथकाकने केली दुरूस्ती - रेल्वे स्थानकांवर ट्रॅक पॉईंट मध्ये बिघाड

ठाणे रेल्वे स्थानकांवर ट्रॅक पॉईंट मध्ये बिघाड झाल्यामुळे अप मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. याबिघाडामुळे अनेक लोकल सेवाना लेटमार्क लागलेला आहे. ही घटना सकाळी घडल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना लेटमार्क लागला आहे. दरम्यान, भियांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन हा बिघाड अवघ्या काही मिनिटात दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर उपनगरीय लोकल सेवा पूर्ववत धावू लागली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Mar 29, 2022, 12:36 PM IST

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकांवर ट्रॅक पॉईंट मध्ये बिघाड झाल्यामुळे अप मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. याबिघाडामुळे अनेक लोकल सेवाना लेटमार्क लागलेला आहे. ही घटना सकाळी घडल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना लेटमार्क लागला आहे. दरम्यान, भियांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन हा बिघाड अवघ्या काही मिनिटात दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर उपनगरीय लोकल सेवा पूर्ववत धावू लागली आहे.

काही मिनिटात बिघाड दुरुस्त- मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी दादर रेल्वे स्थानकाच्या फ्लाट क्रमांक 3 वर ट्रॅक पॉईंटमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकडे जाणारी अप धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, या घटनेची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाला मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन हा बिघाड अवघ्या काही मिनिटात दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर उपनगरीय लोकल सेवा पूर्ववत धावू लागली आहे.

अनेक लोकल सेवांना लेटमार्क- आज पहाटे 4 च्या सुमारास विठ्ठलवाडी जवळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर सिग्नल फेल झाल्याने काही काळ वाहतूक बंद होती, सध्या ती सुरू करण्यात आली आहे. तर, सकाळी ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म 3 वर ट्रॅक पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने मुंबई दिशेने येणाऱ्या गाड्या काही काळ उशिराने धावत आहेत. याचा परिणाम मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

हेही वाचा -नाणार रिफायनरी प्रकल्प लोकांवर लादला जाणार नाही -आदित्य ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details