ठाणे -आयुष्यभर शिवसेना पक्षाची एक निष्ठ राहिलेल्या ६४ वर्षीय शिवसैनिक गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांना उपचारासाठी स्वतःचे घर विकावे लागले. आता पदराचा पैसा संपल्याने कुटूंब हलाखीत जीवन जगत आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या मुलीने शिवसेना नेत्यांकडे वडिलांच्या उपचारासाठी याचना करीत असल्याची बातमी 'ई टीव्ही भारत'ने प्रसारित केली होती. नंदकुमार सांवत असे त्यांचे नाव आहे.
शिवसेना उपजिल्हा प्रमुखांनी केली मदत जाहीर
'ई टीव्ही भारत'च्या बातमीनंतर ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वास थळे यांनी सावंत कुटुंबाकडे धाव घेतली. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. नंदकुमार सावंत यांच्या उपचाराला येणार खर्च पालकमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. तर शिवसेना वैद्यकीय सेवा विभागातील डॉक्टरांचे पथक नंदकुमार सांवत यांच्या घरी जाऊन उपचाराबाबत माहिती घेणार आहेत.
'ई टीव्ही भारत'ला पालकमंत्री शिंदेच्या कार्यालयातून फोन
नंदकुमार सावंत यांची व्यथा 'ई टीव्ही भारत'चे प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे यांनी प्रसारित केली. त्यानंतर नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून फोन आला.