महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gas cylinder explosion: देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट; देवपूजा करणारा गंभीर जखमी - One person injured in a gas cylinder explosion in Thane

देवपूजा करताना अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सिलेंडरच्या स्फोटात देवपूजा करणारा व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे. ( Gas Cylinder Explosion ) ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडली आहे. जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंत मोरे (वय ६५) असे जखमीचे नाव आहे.

देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट
देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट

By

Published : Jul 17, 2022, 5:53 PM IST

ठाणे - देवपूजा करताना अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सिलेंडरच्या स्फोटात देवपूजा करणारा व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडली आहे. ( Gas Cylinder Explosion In Thane ) जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंत मोरे (वय ६५) असे जखमीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

४० टक्के होरपळून गंभीर जखमी - डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास कामावर जाण्यासाठी उठले. त्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लाइटर पेटविण्यासाठी ते गेले असता सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी घरात असलेले हनुमंत मोरे हे जवळपास 40% होरपळून जखमी झाले असून त्यांना शेजाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांच्या मुलाला याची माहिती मिळताच त्यांनी मुंबईच्या कपूर रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना नेले.

स्वयंपाक घरातील संसाराची राख रांगोळी - हा सिलेंडरचा टाकीचा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटात घराचे पत्रे तुटून उडाले. तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाल्याची माहिती त्याच्या मुलागा श्रीनिवास मोरे व अग्निशामक दलाचे शिवाजी म्हात्रे लिडीग फायरमन राजेश कासवे फायरमन यांनी दिली आहे.

हेही वाचा -पतीसोबत झालं भांडण, 'ती' आली अन् मुलासह कृष्णेत उडी मारणार तेवढ्यात...; कराडमधील थरारक घटना

ABOUT THE AUTHOR

...view details