ठाणे - कळव्याच्या शांतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार श्रध्दा संतोष नारकर याच्या संस्थेच्या माध्यमातून हेल्पलाईन क्र.1098 वर करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेऊन कळवा पोलीस ठाण्याला सूचना दिल्यानंतर कळवा पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. गणेश गायके ( वय 36 वर्षे), असे अटकेत असलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
Molested with Minor Girl :अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपीला 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Police Custody
एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयित आरोपीने मुलीस चॉकलेटचे आमीष दाखवत तिच्यावर अत्याचार केले होते. पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 31 मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी ( Police Custody ) ठोठावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून गतिमंद आहे. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून नराधमाने जवळ असलेल्या एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केले. ही घटना 6 मार्च रोजी घडली. पण, तिच्या घरच्यांनी याबाबत कोठेही वाच्यता केली नव्हती. मात्र, परिसरात चर्चा झाल्याने 1098 या क्रमांकावर तक्रा देण्यात आली. त्यानंतर 26 मार्च रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस करण्यात आली. मुलीने सांगितलेल्या वर्णानावरुन पोलिसांनी गणेश गायके या संशयितास ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला, व संशयिताने अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नराधम गणेश गायके यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 31 मार्चपर्यंत आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे ( Police Custody ) आदेश दिले आहेत.
हेही वाचा -Woman Doctor Bodybuilder : महिला डॉक्टर बनली बॉडी बिल्डर; जागतिक स्तरावर कमवले नाव