महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नव्या बुलेट चोरणारी टोळी गजाआड, ४४ बुलेटसह कार घेतल्या ताब्यात - A gang of thieves stealing new bullets

नव्या बुलेट चोरून बनावट कादपत्रांच्या आधारे विक्री करणारी टोळी मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतली आहे. चोरट्यांकडून ४४ बुलेट व सुझुकी मोटार कार असा १ कोटी, ३० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

a-gang-of-thieves-stole-new-bullets
नव्या बुलेट चोरणारी टोळी गजाआड

By

Published : Jan 29, 2021, 4:44 PM IST

नवी मुंबई - नव्या बुलेटची चोरी करून त्याची बनावट कागदपत्रे बनवून विक्री करणारी सराईत टोळी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून गजाआड करण्यात आली आहे. चोरट्यांकडून ४४ बुलेट व सुझुकी मोटार कार असा १ कोटी, ३० हजारांचा मुद्देमाल नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष १ ने हस्तगत केला आहे. तसेच या टोळीकडून आणखी ६४ गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

नव्या बुलेट चोरणारी टोळी गजाआड

नव्या बुलेट चोरी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ:

नवी मुंबईसह ठाणे, पिंपरी चिंचवड पुणे शहर पुणे ग्रामीण अहमदनगर गोवा राज्यात बुलेट चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. रस्त्यावर नवीन बुलेट पार्क केली की तासाभरात त्या बुलेटची चोरी होत असे. त्यामुळे नागरिकांमध्ये बुलेट पार्किंग करण्यात भीती निर्माण झाली होती. त्याचबरोबर मोटरसायकल चोरीचे प्रमाणही वाढले होते.

नवी मुंबई परिसरात लागोपाठ होणाऱ्या नव्या बुलेट चोरीमुळे पोलीस आयुक्तांनी दिले आदेश:

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागोपाठ होणाऱ्या नव्या बुलेट चोरीमुळे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग व अप्पर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी शेखर पाटील यांनी मोटारसायकल बुलेट चोर टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश नाईक व पोलीस नाईक निलेश किंद्रे यांनी मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक तपासाच्या आधारे, या टोळीची माहिती मिळवून आरोपी असलेल्या घटनास्थळी प्रत्येक्ष भेट दिली व वेगवेगळी चार पोलीस पथके तयार करून, या टोळीतील, सोहेल शेख (२८) या रियल इस्टेस्ट एजंटला व सौरभ मिलिंद करंजे (२३) या महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणास वाशी मधून ताब्यात घेतले. तर यांचा साथीदार अमोल शिवाजी ढोबळे (३५) याला म्हापे येथून अटक केले. यातील अमोल ढोबळे हा अट्टल चोर आहे व त्याच्यावर अनेक चोरी व फसवणूकीचे गुन्हे नोंद आहेत. या चोरट्यांनी चोरी केलेल्या ४४बुलेट व सुझुकी मोटार कार असा १ कोटी, ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. व आणखी ६४ गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

गुन्हा करण्याची पद्धत:

अटक आरोपी मोटर सायकल स्पेअर पार्टच्या दुकानात सहज उपलब्ध होणारे नवीन इग्निशन स्विच खरेदी करून रॉयल एनफिल्ड बुलेट हँडलच्या खालच्या डाव्या बाजूस ओपन असणाऱ्या इग्निशन स्वीचचा सॉकेट काढून, त्याने खरेदी केलेला इग्निशन स्विच जोडणी करून, काही सेकंदात नवीन रॉयल एनफिल्ड बुलेट चोरी करत असत. त्यानंतर बुलेटची चोरी करण्यासाठी बनावट आरसी बुक, स्मार्ट कार्ड, बनावट इन्शुरन्स, बनावट नंबर प्लेट लावून बँकेचा रिकवरी एजंट आहे, असे भासवून अनेक लोकांची फसवणूक करून त्या चोरीच्या बुलेटची विक्री करत असत.

ABOUT THE AUTHOR

...view details