महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

A Customer Attacked The Hotel Owner: सिगारेट ओढण्यास मनाई केल्याने ग्राहकाचा हॉटेल मालकावर चाकूने हल्ला - सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने ग्राहकाचा हॉटेल चालकावर हल्ला

हॉटेलमध्ये सिगारेट ओढण्यास मनाई असल्याचे मालकाने ग्राहकाला त्या ग्राहकाला सांगताच, सिगरेट ओढणाऱ्या ग्राहकाला राग आल्याने त्याने धारदार चाकूने हॉटेल मालकासह वेटरवर सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकातील हॉटेल मराठा शाही दरबार येथे घडली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Jul 24, 2022, 5:05 PM IST

ठाणे - एका हॉटेलमध्ये आलेला ग्राहक सिगरेट ओढत होता. मात्र, हॉटेलमध्ये सिगारेट ओढण्यास मनाई असल्याचे मालकाने त्या ग्राहकाला सांगताच, सिगरेट ओढणाऱ्या ग्राहकाला राग आल्याने त्याने धारदार चाकूने हॉटेल मालकासह वेटरवर सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकातील हॉटेल मराठा शाही दरबार येथे घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर ग्राहकावर गुन्हा दाखल केला आहे. जयेश सोनावणे (रा. कानसई, अंबरनाथ) असे गुन्हा दाखल झालेल्या ग्राहकाचे नाव आहे.

रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणासाठी आला - बदलापूर मधील शिरगाव भागात हॉटेल मालक अनिल मराडे (वय ४०) हे कुटूंबासह राहतात. त्यांचे अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकात मराठा शाही दरबार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आरोपी जयेश हा २३ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणासाठी आला होता. त्यावेळी टेबल बसून सिगरेट ओढत असतानाच, त्याला वेटर ओमकार काशीद याने हॉटेलमध्ये सिगारेट ओढण्यास मनाई केली आहे.

हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी - याच गोष्टीचा राग येऊन आरोपी ग्राहकाने कमरेला खोचलेला धारधार चाकू काढून वेटर काशीदच्या पाठीवर वार केले. हे पाहून हॉटेल मालक अनिल हे वेटरच्या बचावासाठी गेले असता आरोपीने त्यांच्याही हातावर चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी जयेश विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या गुन्हा अधिक तपास पोलीस नाईक कुमावत करीत आहेत.

जनजागृती राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येते - सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास सरकारने बंदी घातली असतानाही बहुतांश शासकीय व खाजगी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी बिनधाकपणे अनेक नागरिक सिगारेट ओढताना दिसून येतात. तर, दुसरीकडे सिगारेट ओढल्याने मानवी आरोग्यास धोका असल्याची जनजागृती राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येते. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही.

हेही वाचा -Kadam Vs Thackeray: रामदास कदम- उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये बाचाबाची, खेडमधील प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details