ठाणे - रंग बदलण्यात माहीर असलेला गिरगीट अर्थात 'शामेलियन' नावाचा दुर्मीळ सरडा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळाला. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी नजीक असलेल्या पासले गावातून या दुर्मिळ सरड्याला रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
रंग बदलण्यात माहीर असलेला दुर्मीळ सरडा रेस्क्यू; अंबरनाथ तालुक्यातील वांगणीत आढळला सरडा - शामेलियन सरडा
अंबरनाथ तालुक्यातील वांगणी नजीक असलेल्या पासले गावातून या दुर्मिळ सरड्याला रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सकाळपासून होता झाडावर - ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वांगणी नजीक पासले गावात रामचंद्र बोराडे कुटंबासह राहतात. त्याच्या घराबाहेर अंगणात विविध झाडे लावली आहे. यापैकी एका झाडावर शनिवारी सकाळपासून एक दुर्मिळ दिसणारा सरडा बोराडे यांची मुलगी प्राची हिला दिसला होता. त्यानंतर प्राचीने सर्पमित्र प्रकाश गोईल यांना माहिती दिली कि, सकाळपासून एक हिरव्या रंगाचा सरडा आमच्या घराच्या समोरील एका झाडावर असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्पमित्र प्रकाश यांनी घटनास्थळी जाऊन या सरड्याला रेस्क्यू केले.
शामेलियन जातीच्या सरड्याचे वैशिष्ठ -शामेलियन हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे. भारतात आढळणाऱ्या इतर प्रजातीपेक्षा वेगळा आहे. त्याच्या खडबडीत शरीर, चपट्या केल्यासारख्या बगला , एकावर एक तीन शारस्त्राण घातल्यासारखं डाेकं, कडबाेळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शाेभणारे लुकडे पाय असे त्याचे रूप. सहसा झाडावरच राहताे. तहान लागल्यावर पानावर पडलेले दवबिंदू पिताे; मात्र सरड्याची मादी जमीन उकरून त्यात अंडी घालते. शामेलियनची जीभ म्हणजे त्याचे शस्त्र. आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचून घेते. किडे माकोडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे हे त्याचे खाद्य. डाेळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते शंकुप्रमाणे स्वतंत्र वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. रंग बदलणे ही त्याची माेठी क्षमता. शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला मिळालेली ही देगणी. शरिरातल्या रंगपेशी शक्यतो सभाेवतालच्या रंगानुरूप हुबेहूब रंग धारण करण्याची क्षमता त्यांच्यात असते.