ठाणे - एखाद्याला आलेला राग तो कुठे आणि कसा काढणार याचे वेगळेच उदाहरण समोर आले आहे. एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या प्रवेश दरातच श्वानाचा मृतदेह टाकून त्या घरात राहणाऱ्या कुटुंबासह शेजाऱ्यांनाही आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राम वाधवा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
घराच्या दारातच श्वानाचा मृतदेह टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल, ठाण्यातील प्रकार - thane crime news
एखाद्याला आलेला राग तो कुठे आणि कसा काढणार याचे वेगळेच उदाहरण समोर आले आहे. एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या प्रवेश दरातच श्वानाचा मृतदेह टाकून त्या घरात राहणाऱ्या कुटुंबासह शेजाऱ्यांनाही आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
श्वानाच्या मृतदेहाची दुर्गंधी
उल्हासनगर कॅम्प नंबर ३ भागातील सपना गार्डनसमोर लक्ष्मी पॅलेस नावाची इमारत असून या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २०१ आणि २०२मध्ये धीरजकुमार अयलानी (वय ३८) हे कुटुंबासह राहतात. काल दुपारच्या सुमारास आरोपी राम वाधवा हा त्याच्या साथिदारासह धीरजकुमार यांच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या दरातच श्वानाचा मृतदेह टाकून पसार झाला. काही वेळाने मृत श्वानाच्या मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने धीरजकुमार यांनी मध्यवर्ती पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचानामा करीत श्वानाचा मृतदेहाचे महापालिका आरोग्य विभागाच्या मदतीने दफन केले. त्यानंतर धीरजकुमार यांच्या तक्रारीवरून श्वानाचा मृतदेह घराच्या प्रवेश दारात टाकणाऱ्या राम वाधवासह त्याच्या साथीदारावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक झेंडे करीत आहेत.
हेही वाचा -कुलभूषण जाधव यांना दिलासा; नवीन कायद्यानुसार पाकिस्तानी उच्च न्यायालयात मागता येणार दाद