ठाणे - प्रेम करताना सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागत आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. मात्र याचा विसर पडल्याने रेल्वे स्थानकातच खुल्लमखुल्ला रोमान्स करणाऱ्या ( Viral couple video in Dombivali ) त्या प्रेमीयुगलावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा ( case against couple ) दाखल झाला आहे.
रोमान्सचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल...
7 मार्च रोजी डोंबिवलीच्या रेल्वे स्थानक हद्दीत एक प्रेमियुगल रोमान्स करत असताना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल ( Dombivali railway couple romance ) कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद केले होते. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही याच प्रेमीयुगलाचा रोमान्स एकाने मोबाईलमध्ये ( romance at railway station ) कैद केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यावर प्रेमीयुगलांची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली होती.
Case Against Couple : रेल्वे स्थानकात खुल्लमखुल्ला रोमान्स करणाऱ्या 'त्या' प्रेमीयुगलावर गुन्हा दाखल
7 मार्च रोजी डोंबिवलीच्या रेल्वे स्थानक हद्दीत एक प्रेमियुगल रोमान्स करत असताना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल ( Dombivali railway couple romance ) कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद केले होते. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही याच प्रेमीयुगलाचा रोमान्स एकाने मोबाईलमध्ये ( romance at railway station ) कैद केला होता.
हेही वाचा-Embryo Found Case Nagpur : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढलेले 'ते' भ्रूण नर्सिंगहोममधील; सीसीटीव्ही फुटेजवरुन झाले स्पष्ट
प्रेमीयुगलांचा शोध सुरू
अखेर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी (आज) शुक्रवारी या प्रेमीयुगलावर महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम कलम ११०, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. याबाबत डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वपोनि मुकेश ढगे यांना विचारले असता त्यांनी या प्रेमीयुगलांचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच डोंबिवली रेल्वे स्थानकात अश्या प्रकारे रोमान्स केला, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले.
हेही वाचा-PI Arrested Extortion Case : खंडणी वसूली प्रकरणात पोलीस निरीक्षकाला गुन्हे शाखेकडून अटक