महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Child Died In Thane : नळपाड्यात १० वर्षीय चिमुरड्याचा टाकीत पडून मृत्यू - नळपाड्यात १० वर्षीय चिमुरड्याचा टाकीत पडून मृत्यू

ठाण्यातील नळपाड्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. घराजवळ खेळणारा १० वर्षीय चिमुरडा अचानक जवळच असलेल्या भूमिगत टाकीत पडला. या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला ( Child Died Fall In Tank ) असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नळपाड्यात १० वर्षीय चिमुरड्याचा टाकीत पडून मृत्यू
नळपाड्यात १० वर्षीय चिमुरड्याचा टाकीत पडून मृत्यू

By

Published : Jan 18, 2022, 9:35 PM IST

ठाणे :ठाण्याच्या नळपाडा भागात १० वर्षीय मुलाचा टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली ( Child Died Fall In Tank ) आहे. साहिल जैस्वाल हा मुलगा आपल्या घराजवळ खेळायला गेला होता. यावेळी भूमिगत असलेल्या टाकीत तो पडला. टाकीला झाकन नसल्याने अचानक तो टाकीत पडला. ही टाकी ३५ फूट खोल असल्याने त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. परिसरात आरडाओरडा झाल्याचे कळताच त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

नळपाड्यात १० वर्षीय चिमुरड्याचा टाकीत पडून मृत्यू

रेस्क्यूव्हॅनद्वारे काढले बाहेर

या प्रकरणाची माहिती मिळताच पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन, कापूरबावडी पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रेस्क्यूव्हॅनद्वारे साहिल जैस्वाल याला बाहेर काढण्यात आल्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला असून, निष्काळजीपणामुळे या चिमुरड्याचा जीव गेला असल्याचे यावेळी स्थानिकांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खुप वेळ सुरू होता बचाव

ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दल यंत्रणा या दोन्ही बराच वेळ साहिलला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचे हे प्रयत्न साहिलला फार काळ जिवंत ठेवू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details