ठाणे - आगामी नववर्षस्वागत ( New Year Celebration 2022 ) आणि नाताळ सुट्टीसाठी ( Christmas holidays ) हौशी पर्यटकांची पाऊले पर्यटनस्थळांकडे ( Thane Tourism ) वळू लागली आहे. मागील गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या भितीमुळे हौशी पर्यटकांना मित्र, कुटूंबीय आणि नातेवाईकांसोबत पर्यटनास मूकावे लागले होते. आता मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ आणि नववर्ष स्वागताची भुरळ पर्यटनप्रेमींना पडू लागल्याने ठाणे, पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या निवासाचे ९० टक्के आरक्षण करण्यात आल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ओमायक्रॉनचा फारसा परिणाम नाही ( Omicron Patients In Maharashtra ) -
ठाणे जिल्ह्यात २१ पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, शहापूर तालुक्यातील निसर्गरम्य रिसॉर्ट, पालघर जिल्ह्यातील वसई, डहाणू, जव्हार तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रेप पार्क, भंडारदरा, लोणावळा (कार्ला), माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे अशा प्रमुख ठिकाणी पर्यटकांच्या निवासाचे ९० टक्के आरक्षण झाले आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातील खाजगी निसर्गरम्य परिसरात असलेल्या बहुतांश रिसॉर्टची बुकींग आदीच झाल्याने येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसचा नवा विषाणू म्हणजे ओमायक्रोनची भिती आहे. मात्र शासनाने केलेल्या उपाययोजना व नव्या विषाणू ओमायक्रोनचा फारसा परिणाम दिसत नसल्याने पर्यटनाकडील ओढा वाढू लागला आहे.